नाशिक जिल्ह्यात आणखी एका एसटी कर्मचाऱ्याची आत्महत्या

A PHP Error was encountered

Severity: Notice

Message: Undefined property: stdClass::$link

Filename: post/_post_share_box.php

Line Number: 27

Backtrace:

File: /home/prabo1/public_html/application/views/post/_post_share_box.php
Line: 27
Function: _error_handler

File: /home/prabo1/public_html/application/views/post/post.php
Line: 78
Function: view

File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 294
Function: view

File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 119
Function: post

File: /home/prabo1/public_html/index.php
Line: 326
Function: require_once

नाशिक जिल्ह्यात आणखी एका एसटी कर्मचाऱ्याची आत्महत्या
नाशिक -
कमी पगारामुळे आलेल्या नैराश्यातून नाशिक जिल्ह्यातल्या पेठ आगारातील आणखी एका एसटी चालकाने राहत्या घरी आत्महत्या केली. गहिनीनाथ गायकवाड असे या कर्मचाऱ्याचे नाव आहे. दरम्यान, नाशिक जिल्ह्यातील एसटी कर्मचाऱ्यांनी त्यांचे आंदोलन अजून तीव्र केले असून, लवकरात लवकर मागण्या मान्य कराव्यात. एसटीचे राज्य सरकारमध्ये विलीनीकरण करावे, या मागणीचा पुनरुच्चार केला आहे.

नाशिक जिल्ह्यात गेल्या 11 दिवसांपासून एसटी कर्मचाऱ्यांचे आंदोलन सुरू आहे. त्यामुळे जिल्ह्यातील 13 डेपोंची वाहतूक पूर्णपणे ठप्प आहे. एसटी कर्मचाऱ्यांच्या या संपाला संघर्ष कामगार युनियनने पाठिंबा दिला आहे. हे आंदोलन दडपण्यासाठी प्रशासन सक्रिय झाले असून, त्यांनी रोजंदारीवर काम करणाऱ्या 51 कर्मचाऱ्यांना सेवा समाप्तीची नोटीस पाठवली आहे. आतापर्यंत 85 हून अधिक कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई केली आहे. आता नोटीस पाठविलेल्या कर्मचाऱ्यांना चोवीस तासांच्या आत कामावर या, अन्यथा कारवाई करू असा इशारा दिला आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये असंतोष वाढला असून, आंदोलन पुन्हा चिघळण्याची शक्यात निर्माण झाली आहे. यात अनेक कर्मचारी कमी पगार आणि घरातील आर्थिक परिस्थिती बेताची असल्याने टोकाचे पाऊल उचलत आहेत. पेठ आगारातील चालक गहिनीनाथ गायकवाड यांनी या आर्थिक कोंडीतूनच आत्महत्या केल्याचे समोर येत आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये संतापाची भावना आहे.