बाळासाहेब ठाकरे यांचे ३८ वर्षे जुने व्यंग्यचित्र अरविंद सावंतांनी केले शेअर
A PHP Error was encountered
Severity: Notice
Message: Undefined property: stdClass::$link
Filename: post/_post_share_box.php
Line Number: 27
Backtrace:
File: /home/prabo1/public_html/application/views/post/_post_share_box.php
Line: 27
Function: _error_handler
File: /home/prabo1/public_html/application/views/post/post.php
Line: 78
Function: view
File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 294
Function: view
File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 119
Function: post
File: /home/prabo1/public_html/index.php
Line: 326
Function: require_once
मुंबई, (प्रबोधन न्यूज) - केंद्रीय निवडणूक आयोगाने शिवसेनेचे पक्षचिन्ह धनुष्यबाण तात्पुरते गोठविल्यानंतर निवडणूक आयोगाने शिंदे गटाला ‘बाळासाहेबांची शिवसेना’ असे नाव दिले आहे. तर उद्धव ठाकरे गटला ‘शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)’ हे नाव दिले आहे. तसेच ठाकरे गटाला ‘मशाल’ चिन्ह दिले असून, शिंदे गटाचे लवकरच चिन्ह आयोग जाहीर करणार आहे. या पार्श्वभूमीवर ठाकरे गटातील नेते अरविंद सावंत यांनी बाळासाहेब ठाकरे यांनी ३८ वर्षांपूर्वी काढलेले व्यंग्यचित्र ट्विटरवर शेअर केले आहे.
हे चित्र बाळासाहेब ठाकरे यांनी १९८४ मध्ये काढले होते. “कमळ दिलं त्यावेळी सुखावलात, आता मशालीची धग सहन करा”,असा इशारा बाळासाहेबांनी या व्यंग्यचित्राच्या माध्यमातून भाजपाला दिला होता.आता पुन्हा एकदा तशीच काहीशी परिस्थिती निर्माण झाली आहे, असे अरविंद सावंत यांना म्हटले आहे.
एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी केल्यानंतर शिवसेनेत मोठी फूट पडली. आता शिंदे यांनी भाजपासोबत सत्ता स्थापन केली आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे आणि भाजपामध्ये राजकीय वातावरण तापलेले आहे. हे पाहता सावंत यांनी केलेल्या ट्विटची बरीच चर्चा राजकीय वर्तुळात आहे.