विधानसभा अध्यक्ष कोण होणार? विखे-पाटील की दीपक केसरकर का तिसराच कोणी?

A PHP Error was encountered

Severity: Notice

Message: Undefined property: stdClass::$link

Filename: post/_post_share_box.php

Line Number: 27

Backtrace:

File: /home/prabo1/public_html/application/views/post/_post_share_box.php
Line: 27
Function: _error_handler

File: /home/prabo1/public_html/application/views/post/post.php
Line: 78
Function: view

File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 294
Function: view

File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 119
Function: post

File: /home/prabo1/public_html/index.php
Line: 326
Function: require_once

विधानसभा अध्यक्ष कोण होणार? विखे-पाटील की दीपक केसरकर का तिसराच कोणी?

मुंबई, (प्रबोधन न्यूज) - राज्यातील महाविकास आघाडी सरकार कोसळल्यानंतर एकनाथ शिंदे यांचे सरकार स्थापन झाले आहे. एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री आणि देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली आहे. त्यानंतर राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी नव्या सरकारला बहुमत सिद्ध करण्याचे आदेश दिले आहेत. त्यासाठी येत्या 3 आणि 4 जुलै रोजी सत्र घेण्यात येणार आहे.

शिंदे सरकारच्या बहुमत चाचणीपूर्वी एकनाथ शिंदे सरकारची विधानसभेत परीक्षा होईल. रविवारी विधानसभा अध्यक्षांची निवडणूक होईल. याच निवडणुकीसाठी अर्ज भरण्याची मुदत शनिवारपर्यंत आहे. रविवारी अध्यक्षपदाची निवड झाल्यानंतर विश्वासदर्शक ठराव मांडला जाईल. गेल्या वर्षभरापासून रखडलेली विधानसा अध्यक्षांची निवड येत्या दोन दिवसांत होणार आहे.

एकीकडे सरकारने कांजूरमार्गमधील मेट्रो स्टेशन पुन्हा आरेमध्ये आणण्याचा निर्णय घेत उद्धव ठाकरे आणि शिवसेनेला मोठा धक्का दिलेला असतानाच दुसरीकडे नाना पटोले यांच्या राजीनाम्यानंतर रिक्त असलेल्या विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीचा कार्यक्रम देखील जाहीर करण्यात आला आहे. बहुमत सिद्ध करण्यासाठी बोलावण्यात आलेल्या विशेष अधिवेशनातच ही निवडणूक पार पडणार असल्याचं स्पष्ट करण्यात आलं आहे. यासंदर्भात विधिमंडळ सचिवालयाकडून पत्रकच जारी करण्यात आलं आहे.

अध्यक्षपदाच्या निवडणुकीत सरकारनं बाजी मारली तर शिंदे सरकारचे विधानसभेतील बहुमत सिद्ध होईल. त्यानंतर विश्वासदर्शक ठराव ही औपचारिकता असेल. त्यामुळे शिंदे सरकारची खरी परीक्षा रविवारी होणार आहे. या सरकारला कोणत्याही परिस्थितीमध्ये विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक जिंकावी लागेल.

विधानसभा अध्यक्षपदाला असलेले घटनात्मक अधिकार लक्षात घेता शिंदे सरकारकडून त्यासाठी कुणाची निवड केली जाते हे पाहणे महत्त्वाचे आहे. या पदासाठी भाजपाकडून राधाकृष्ण विखे पाटील तर शिंदे गटाकडून दीपक केसरकर यांचे नाव चर्चेत आहे. हे दोन्ही नेते अनुभवी असून राजकीय कसोटीच्या प्रसंगी त्यांचा अनुभव कामी येऊ शकतो. अर्थात भाजपाकडून ऐनवेळी धक्कातंत्राचा वापर करून नव्या नावाचा प्रस्तावही सादर केला जाऊ शकतो.

विधानसभा अध्यपदासाठी तीन ते चार नाव सध्या चर्चेत आहेत. मात्र, त्यामध्ये विखे पाटील यांचे नाव आघाडीवर आहेत. आज संध्याकाळपर्यंत एका नावावर शिक्कामोर्तब होणार असून, दुपारी चार वाजता भाजपची महत्वाची बैठक देखील होणार आहे. दरम्यान, भाजपच्या सर्व आमदारांना दुपारी दोन वाजता महाराष्ट्र प्रदेश कार्यालयात उपस्थित राहण्याचे सांगण्यात आले आहे. भाजप कार्यालयात आज जल्लोषाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. भारतीय जनता पक्षाते प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आज चार वाजता भाजप कार्यालयात पत्रकार परिषद घेणार आहेत. सुत्रांनी दिलेल्या माहितीनूसार, मुंबईतील दादर नायगाव मतदार संघाचे आमदार कालिदास कोळंबकर यांची विधानसभा अध्यक्षपदी निवड केली जाऊ शकते.