खरी शिवसेना कोणाची? येत्या 2-3 दिवसांत निकाल लागणार?

A PHP Error was encountered

Severity: Notice

Message: Undefined property: stdClass::$link

Filename: post/_post_share_box.php

Line Number: 27

Backtrace:

File: /home/prabo1/public_html/application/views/post/_post_share_box.php
Line: 27
Function: _error_handler

File: /home/prabo1/public_html/application/views/post/post.php
Line: 78
Function: view

File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 294
Function: view

File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 119
Function: post

File: /home/prabo1/public_html/index.php
Line: 326
Function: require_once

खरी शिवसेना कोणाची? येत्या 2-3 दिवसांत निकाल लागणार?

कागदपत्रे सादर करण्याची मुदत आज संपुष्टात

नवी दिल्ली - शिंदे गटाकडून धनुष्यबाण चिन्ह आणि पक्षाचं नाव शिवसेनेवर दावा करण्यात आल्यानं निवडणूक आयोगानं चिन्ह गोठवण्याचा निर्णय घेतला होता. त्यावर आता निवडणूक आयोगात सुनावणी सुरू आहे. चिन्हाच्या निर्णयाबाबत दोन शक्यता वर्तवण्यात येत आहेत. एक म्हणजे आज दोन्ही गटाने आपलं म्हणण लेखी स्वरुपात निवडणूक आयोगाकडे सादर केल्यानंतर आजच धनुष्यबाणाबाबत निर्णय होऊ शकतो. किंवा निवडणूक आयोग चिन्हाबाबतचा निर्णय राखून देखील ठेवण्याची शक्यता आहे. त्यामुळे आजचा दिवस ठाकरे आणि शिंदे गट तसेच राज्याच्या दृष्टीने महत्त्वाचा आहे.

एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेतून उठाव केल्यानंतर शिवसेनेत दुफळी निर्माण झाली. एकनाथ शिंदे यांना पक्षातील अनेक आमदारांनी पाठिंबा दिल्यानं शिवसेनेमध्ये शिंदे गट आणि ठाकरे गट असे दोन गट निर्माण झाले. त्यानंतर पक्षातील सर्वाधिक आमदारांचा आम्हाला पाठिंबा असल्यानं आम्हीच खरी शिवसेना असं म्हणत शिंदे गटाकडून धनुष्यबाण चिन्हावर दावा करण्यात आला. तर दुसरीकडे ठाकरे गटाने मुळ शिवसेना म्हणून चिन्हावर दावा केला होता. त्यामुळे धनुष्यबाण चिन्ह आणि पक्षाचं नाव निवडणूक आयोगाकडून गोठवण्यात आले आहे. त्यावर आता निवडणूक आयोगासमोर सुनावणी सुरू आहे.

अंधेरी विधानसभा पोटनिवडणुकीच्या वेळी आयोगाने शिवसेना हे नाव आणि धनुष्यबाण हे निवडणूक चिन्ह गोठवून दोन्ही गटांना स्वतंत्र नावे आणि चिन्हे दिली होती. आयोग आता त्याधर्तीवरच अंतिम निर्णय देणार की शिवसेना हे नाव आणि धनुष्यबाण चिन्ह मिळविण्यात एका गटाला यश मिळणार, याकडे राज्यातील जनतेचे लक्ष लागले आहे.

शिवसेनेतील ४० आमदार व १३ खासदार आपल्याबरोबर असून राष्ट्रीय कार्यकारिणीतील अनेक पदाधिकाऱ्यांचा आपल्याला पाठिंबा आहे. त्यामुळे खरी शिवसेना आपलीच असून धनुष्यबाण हे निवडणूक चिन्ह आपल्यालाच मिळावे, अशी मागणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी निवडणूक आयोगाकडे केली आहे. शिवसेनेच्या घटनेला आणि उद्धव ठाकरे यांच्या पक्षप्रमुखपदी झालेल्या निवडीला शिंदे गटाने आयोगापुढे आक्षेप घेतला आहे.

तर ठाकरे गटाने शिंदे गटाचे आक्षेप खोडून काढून आमदार अपात्रतेच्या याचिका सर्वोच्च न्यायालयाच्या घटनापीठापुढे प्रलंबित असताना याप्रकरणी आयोगाने निर्णय देऊ नये, अशी भूमिका मांडली आहे. राष्ट्रीय कार्यकारिणीतील बहुसंख्य पदाधिकारी आपल्याबरोबर आहेत. विधानपरिषदेतील आमदार व राज्यसभेतील खासदार आपल्याबरोबर आहेत. शिंदे गटाने सादर केलेली कागदपत्रे खोटी आहेत, त्यांची छाननी करावी, आदी मुद्दे ठाकरे गटाने मांडले आहेत.