ठाकरेंच्या दसरा मेळाव्यासाठी राष्ट्रवादीची बॅनरबाजी

A PHP Error was encountered

Severity: Notice

Message: Undefined property: stdClass::$link

Filename: post/_post_share_box.php

Line Number: 27

Backtrace:

File: /home/prabo1/public_html/application/views/post/_post_share_box.php
Line: 27
Function: _error_handler

File: /home/prabo1/public_html/application/views/post/post.php
Line: 78
Function: view

File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 294
Function: view

File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 119
Function: post

File: /home/prabo1/public_html/index.php
Line: 326
Function: require_once

ठाकरेंच्या दसरा मेळाव्यासाठी राष्ट्रवादीची बॅनरबाजी

मुंबई, (प्रबोधन न्यूज) - ठाकरे गटाने दसरा मेळाव्यासाठी टीझर प्रसिद्ध केले असून, शहरात बॅनरबाजीही करण्यात आली आहे. दुसरीकडे राष्ट्रवादीने दसरा मेळाव्यासाठी शिवसेनेला पाठिंबा दिला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून मातोश्रीबाहेर शिवसेना आणि उद्धव ठाकरे यांना शुभेच्छा देणारे पोस्टर लावले आहेत. एवढेच नाही तर उद्धव ठाकरे यांच्या दसरा मेळाव्यासाठी राज्यभरातून राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात सहभागी होणार असल्याचे समजतंय.

राष्ट्रवादीच्यावतीने मातोश्रीबाहेर लावण्यात आलेल्या बॅनरमध्ये “एक संघटना, एक विचार, एकच मैदान, शिवसेनेचा दसरा मेळावा, दसरा मेळाव्यासाठी खूप-खूप शुभेच्छा” असा मजकूर छापण्यात आला आहे. तसेच त्यावर राष्ट्रवादीचे नेते शरद पवार, छगन भुजबळ, सुप्रिया सुळे यांच्यासह शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे यांचे फोटोदेखील दिसून येत आहेत. दरम्यान, विरोधी पक्षनेते अजित पवार यांनीसुद्धा “मी पहिल्यांदा उद्धव ठाकरे यांचे भाषण ऐकेन  व नंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे भाषण ऐकेन.” असे म्हटले होते.

दुसरीकडे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा दसरा मेळावा बीकेसीच्या मैदानावर होणार आहे. या मेळाव्याला जास्तीत जास्त गर्दी व्हावी यासाठी शिंदे गटांकडून प्रयत्न सुरू आहेत. शिंदे गटाने दसरा मेळाव्यासाठी टीझर प्रसिद्ध केले असून, शहरात ठिकठिकाणी बॅनर लावण्यात आले आहेत. त्यामुळे मुंबईतील राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. दोन्ही गटाकडून आपलीच शिवसेना खरी हे दाखवण्यासाठी व दसरा मेळावा भव्य-दिव्य करण्यासाठी गावोगावच्या शिवसेनेच्या कार्यकर्त्यांची खेचा-खेची सुरू आहे.

दरम्यान, मिलिंद नार्वेकर हे ठाकरे गटाच्या दसरा मेळाव्याला हजर राहणार असल्यामुळे नार्वेकर हे शिंदे गटात सामिल होण्याच्या वावड्यांना पूर्णविराम मिळाला आहे.