काळजी घ्या, भेसळयुक्त रंग तुमच्या रंगाचा भंग तर करणार नाही ना ?
A PHP Error was encountered
Severity: Notice
Message: Undefined property: stdClass::$link
Filename: post/_post_share_box.php
Line Number: 27
Backtrace:
File: /home/prabo1/public_html/application/views/post/_post_share_box.php
Line: 27
Function: _error_handler
File: /home/prabo1/public_html/application/views/post/post.php
Line: 78
Function: view
File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 294
Function: view
File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 119
Function: post
File: /home/prabo1/public_html/index.php
Line: 326
Function: require_once
आज होळी आहे. उद्या धुळवड साजरा केली जाईल. खरं तर प्रथेप्रमाणे होळीच्या दुसऱ्या दिवशी सकाळी होळीमध्ये दूध व पाणी टाकून ती थंड केली जाते. नंतर होळीमध्ये जो चिखल झाला असेल तो चिखल सर्वजण एकमेकांना फासून धुळवड साजरी केली जाते. हा चिखल आरोग्यासाठी चांगला असतो. परंतु हल्ली तसे न करता सर्रास रंगपंचमी साजरी केली जाते. जी होळीच्या सणापासून ५ व्या दिवशी रंगपंचमी येते. त्या दिवशी रंगपंचमी खेळली जाते. असो.
या सणाच्या पार्श्वभूमीवर सिंथेटिक आणि भेसळयुक्त रंग आणि गुलालाची बाजारपेठ फुलली आहे. हे केमिकलयुक्त रंग आणि गुलाल रंग मिसळले जातात. अनेकवेळा या रंगांमुळे लोकांचे आयुष्य पणाला लावले जाते. हे टाळण्यासाठी विशेष खबरदारी घेणे आवश्यक आहे.
फुलांची होळी खेळणे किंवा फुलांच्या पाकळ्या सुकवून त्याचा रंग तयार करून खेळणे आरोग्यासाठी फायदेशीर आहे. किंवा आपण याला eco-friendly होळी असे ही म्हणू शकता. रासायनिक रंगांमुळे त्वचेच्या आजारांसह अनेक मोठे आजार होतात. त्याचबरोबर भेसळयुक्त रंगाचा व्यवसाय करणाऱ्यांवर कारवाई होत नाही, हे दुर्दैव आहे.
भेसळयुक्त रंग बाजारात स्वस्त दरात विकले जात आहेत. एक किलो गुलाल 70 ते 80 रुपयांना सहज विकला जात आहे. गुलालात संगमरवरी आणि अभ्रकाचा तुकडा मिसळला जातो. रंगांचा व्यवसाय करणारे व्यापारी गुलाल पॉलिथिनमध्ये पॅक करून विकत आहेत.
बाजारात विकल्या जाणाऱ्या पांढऱ्या पॉलिशमध्ये बहुतांश रसायनांचे मिश्रण असते. पूर्वांचलमध्ये एक हजार क्विंटल रंग आणि गुलाल वापरला जातो.या सर्वांमध्ये आपण जल प्रदुषणाला विसरून जात आहोत.
कोणत्या भेसळीच्या रंगामुळे कोणता आजार होतो जाणून घ्या.
काळा रंग - यामध्ये लीड ऑक्साईड असते जो शरीरातून बाहेर पडतो आणि आत गेल्यास किडनीलाही नुकसान पोहोचू शकते.
हिरवा रंग - तांबे सल्फेट आहे. त्यामुळे डोळे आणि चेहऱ्यावर सूज येते. ऍलर्जी होते.
चंदेरी रंग - यामुळे त्वचेचा कर्करोग होण्याचा धोका असतो.
निळा रंग - पांढरा डाग असू शकतो. त्वचेची ऍलर्जी होऊ शकते.
लाल रंग - यामध्ये मर्क्युरी सल्फाइड असतो जो त्वचेच्या कर्करोगासाठी जबाबदार असतो.
गुलाल - गुलाल त्वचेवरुन जरी रासायनिक रंगापेक्षा सहज निघत असला तरी तो नैर्सगिक नाही. भेसळयुक्त गुलाल आरोग्यावर परिणाम करतो. त्यामुळे फुफ्फुसाच्या आजाराचा धोका कायम आहे. रंगासोबत स्टार्च देखील हानिकारक आहे. गुलालाचा केसांवर परिणाम होतो.
घरच्या घरी हर्बल कलर बनवा
गुलाब, झेंडू आणि इतर फुलांच्या पाकळ्या उन्हात वाळवाव्यात. त्यांची गुलाला सारखी बारीक पावडर बनवुन आरोग्यदायी आणि ECO FRIENDLY होळी खेळा. याशिवाय ताज्या फुलांनीही होळी खेळली जाते. याशिवाय हळदीचे द्रावण करून रंग खेळू शकता.
रंगांमुळे बुरशीजन्य (फंगल इंफेक्शन) संसर्गाचा धोका
त्वचारोग तज्ज्ञ डॉ. अरविंद सिंग यांनी सांगितले की, रंगांमुळे बुरशीजन्य संसर्ग आणि ऍलर्जीचा धोका असतो. त्यामुळे शरीरावर पुरळ, पिंपल्स, खाज सुटणे इ. बाधा झाल्यानंतर लगेच साबणाने धुवा आणि पूर्णपणे कोरडे झाल्यानंतर अँटीसेप्टिक क्रीम लावा. जर तुम्हाला आराम मिळत नसेल तर नक्कीच डॉक्टरांकडे जा.
बीएचयू रुग्णालयातील नेत्ररोग विभागाचे प्रा. एम.के. सिंग म्हणाले की, डोळ्यांचे रंगांपासून संरक्षण केले पाहिजे. डोळ्यात रंग गेल्याने अनेकदा कॉर्निया जाण्याचा धोका असतो. काळजी न घेतल्याने डोळ्यांमध्ये जळजळ होणे, अंधुक दृष्टी येण्याची दाट शक्यता असते.