देवेंद्र फडणवीस यांच्यामुळेच माझा विजय – सुधाकर आडबाले

A PHP Error was encountered

Severity: Notice

Message: Undefined property: stdClass::$link

Filename: post/_post_share_box.php

Line Number: 27

Backtrace:

File: /home/prabo1/public_html/application/views/post/_post_share_box.php
Line: 27
Function: _error_handler

File: /home/prabo1/public_html/application/views/post/post.php
Line: 78
Function: view

File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 294
Function: view

File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 119
Function: post

File: /home/prabo1/public_html/index.php
Line: 326
Function: require_once

देवेंद्र फडणवीस यांच्यामुळेच माझा विजय – सुधाकर आडबाले

नागपूर, (प्रबोधन वृत्तसेवा) – नागपूर शिक्षक मतदारसंघामध्ये मोठ्या फरकाने विजयी झालेले महाविकास आघाडीचे उमेदवार सुधाकर आडबाले यांनी आपल्या विजयाचे श्रेय उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिले आहे. या मागचा आपला तर्कही त्यांनी समजावून सांगितला आहे. ते म्हणतात, महाराष्ट्र सरकार जुनी पेन्शन योजना पुन्हा लागू करण्याच्या मनस्थितीत नसल्याचे देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत सांगितले होते. असे केल्याने सरकारवर मोठा आर्थिक बोजा पडणार आहे. त्यामुळे शिक्षक व कर्मचारी दोघेही संतप्त झाले. याचाच फायदा त्यांना या विजयाच्या रूपाने मिळाला असल्याचं आडबले म्हणाले आहेत.

एन.जी.गणार या निवडणुकीत हॅट्ट्रिक साधतील आणि यावेळीही विजयी होतील, असा विश्वास होता. मात्र, सर्व अंदाज खोटे ठरवत महाविकास आघाडीचे उमेदवार सुधाकर आडबाले विजयी झाले आहेत. नागपूरसह सहा जिल्ह्यांमध्ये या या जागेसाठी ८७ टक्के मतदान झाले. आश्चर्याची बाब म्हणजे या विजयाचे श्रेय त्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिलं आहे. देवेंद्र फडणवीस यांच्यामुळेच मी ही निवडणूक जिंकल्याचं विधान आडबाले यांनी केलं आहे. आडबले यांचे हे विधान राज्याच्या राजकारणात चर्चेचा विषय बनलं आहे.

राजकीय विश्लेषकांच्या मते, नागपूरच्या भाजपच्या राजकारणात दोन गटांमध्ये संघर्ष असल्याचे बोलले जाते. एका बाजूला नितीन गडकरींचा गट तर दुसऱ्या बाजूला देवेंद्र फडणवीस यांचा. एन.जी.गणार हे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या अत्यंत निकटवर्तीय नेते असल्याचं मानलं जातं. नागपूर आणि विदर्भात हे सर्वश्रुत आहे. दुसरीकडे ते दोन वेळा आमदारही राहिले आहेत. अशा स्थितीत त्यांच्याबद्दल लोकांच्या मनात काहीशी नाराजी होती. दुसरीकडे भाजपमधील अंतर्गत कलह हेही त्यांच्या पराभवाचे प्रमुख कारण ठरल्याचं बोललं जातं आहे.