छगन भुजबळ यांच्याविरोधात जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी गुन्हा दाखल
A PHP Error was encountered
Severity: Notice
Message: Undefined property: stdClass::$link
Filename: post/_post_share_box.php
Line Number: 27
Backtrace:
File: /home/prabo1/public_html/application/views/post/_post_share_box.php
Line: 27
Function: _error_handler
File: /home/prabo1/public_html/application/views/post/post.php
Line: 78
Function: view
File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 294
Function: view
File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 119
Function: post
File: /home/prabo1/public_html/index.php
Line: 326
Function: require_once
मुंबई, (प्रबोधन न्यूज) - माजी मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांच्याविरोधात जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भुजबळ आणि इतर दोघांविरुद्ध भारतीय दंड संहिता (IPC) कलम 506 (2) (गुन्हेगारी धमकी) आणि 34 (सामान्य हेतू) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे," चेंबूर येथील व्यावसायिक आणि सामाजिक कार्यकर्ते ललित कुमार टेकचंदानी यांनी भुजबळांविरोधात चेंबूर पोलिसांकडे तक्रार केली होती.
टेकचंदानी यांनी भुजबळांच्या मोबाईलवर दोन व्हिडिओ पाठवले होते. या व्हिडिओत भुजबळ हे हिंदू धर्माचा अपमान करत असल्याचे सांगण्यात आले होते. मात्र, हे व्हिडिओ पाठवताच आपल्याला जीवे मारण्याच्या धमक्या देण्यात आल्या, असा आरोप टेकचंदानी यांनी केला आहे.
धमकीप्रकरणी टेकचंदानी यांनी चेंबूर पोलिसांत तक्रार केली होती. तक्रारीमध्ये टेकचंदानी यांनी सांगितले की, आपल्याला वेगवेगळ्या नंबरांवरून ''भुजबल साहब को मैसेज करता है, दुबईवालों को कहकर गोली मरवाता हूं तुझे'', अशा धमक्या देण्यात आल्या.
भुजबळांविरोधात गुन्हा दाखल होताच भाजप नेते आक्रमक झाल्याचे पाहायला मिळत आहे. भाजपचे अंधेरी पश्चिमचे आमदार अमित साटम यांनी म्हटले आहे की, भुजबळ यांनी व्यावसायिकाला जीवे मारण्याची धमकी दिली. भुजबळ यांची अंडरवर्ल्ड आणि पीएफआयशी काही लिंक्स आहेत का? याचाही तपास झाला पाहिजे. अशा देशविरोधी शक्तींवर वेळीच कारवाई व्हावी. तर मध्य मुंबईचे भाजप खासदार राहुल शेवाळे यांनी म्हटले आहे की, चेंबूरचे व्यावसायिक ललित टेकचंदानी यांना धमक्या कोणी दिल्या? या धमक्यांना माजी मंत्र्यांचे समर्थन होते का? या सर्व प्रकरणाचा तपास झाला पाहिजे. भाजप आमदार नितेश राणे यांनीही छगन भुजबळ यांच्यावर टीका केली आहे. राणे म्हणाले, देवी सरस्वतीचा तिरस्कार करणाऱ्याविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. आता त्यांना देवी सरस्वतीही वाचवू शकत नाही. महाराष्ट्रात आता हिंदूत्ववादी सरकार आहे. हे लक्षात ठेवावे.
छगन भुजबळ यांनी दोनच दिवसांपूर्वी महाराष्ट्रातील शाळांमध्ये सरस्वती देवीची मूर्ती ठेवण्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. तसेच, शाळांमध्ये देवीची मूर्ती का, असा सवालही राज्य सरकारला केला होता. त्यानंतर हिंदू संघटनांमध्ये असंतोष पसरला होता. छगन भुजबळ यांना सोशल मीडियावरूनही ट्रोल करण्यात आले होते.