ब्रेकिंग न्यूज - सदाभाऊ खोतांनी उमेदवारी अर्ज मागे घेतला

A PHP Error was encountered

Severity: Notice

Message: Undefined property: stdClass::$link

Filename: post/_post_share_box.php

Line Number: 27

Backtrace:

File: /home/prabo1/public_html/application/views/post/_post_share_box.php
Line: 27
Function: _error_handler

File: /home/prabo1/public_html/application/views/post/post.php
Line: 78
Function: view

File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 294
Function: view

File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 119
Function: post

File: /home/prabo1/public_html/index.php
Line: 326
Function: require_once

ब्रेकिंग न्यूज - सदाभाऊ खोतांनी उमेदवारी अर्ज मागे घेतला

मुंबई, (प्रबोधन न्यूज) - भाजपप्रणित सहावे उमेदवार असलेल्या सदाभाऊ खोतांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला आहे. विधान परिषदेचा अर्ज मागे घ्यायला अगदी ५ मिनिटांची वेळ शिल्लक असताना भाजपच्या पाठिंब्यावर अपक्ष म्हणून अर्ज दाखल केलेल्या सदाभाऊ खोत यांनी अर्ज माघारी घेतला आहे. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या आदेशानुसार आपण अर्ज मागे घेत असल्याचं सदाभाऊ खोत यांनी सांगितलं.

सदाभाऊ खोत यांनी भाजपच्या पाठिंब्यावर ९ जून रोजी अर्ज दाखल केला होता. फडणवीसांच्या सांगण्यानुसार अर्ज भरलाय. त्यांनी सांगितलं तर पुन्हा माघारही घेऊ, असंही त्यावेळी सदाभाऊ खोत यांनी म्हटलं होतं.

त्यामुळे आता भाजपचे पाच उमेदवार राहिले आहेत. सदाभाऊ खोतांनी उमेदवारी अर्ज मागे का घेतला याबाबत फडणवीसांनी स्पष्टीकरण दिले आहे. ''पक्षात सर्वांशी चर्चा करून सदाभाऊंचा अर्ज मागे घेण्यात आला आहे'' असे देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत.

भाजपचे पाचवे उमेदवार असलेले प्रसाद लाड यांना निवडणून आणण्यासाठी भाजपला कसरत करावी लागणार आहे. कारण भाजपला पाचव्या जागेसाठी कोट्यापेक्षा कमी मतं शिल्लक राहत आहेत. याबाबात देवेंद्र फडणवीस म्हणाले की ही निवडणूक सोपी बिलकूल नाहीये. आम्ही सर्व गणितं आखलेली आहेत. पाचवा उमेदवार आमचाच निवडून येईल.

कोणत्या पक्षाचे कोणते उमेदवार रिंगणात?

भाजप

उमा खापरे

प्रवीण दरेकर

राम शिंदे

श्रीकांत भारतीय

प्रसाद लाड

भाजपने हे आपले पाच उमेदवार रिंगणात उतरवले आहेत. प्रवीण दरेकर यांना पुन्हा उमेदवारी देण्यात आली आहे. प्रसाद लाड यांच्याविषयी भाजप कशी रणनिती वापरते हे पाहावे लागणार आहे.

शिवसेना

आमश्या पाडवी

सचिन अहिर

राष्ट्रवादी काँग्रेस

रामराजे नाईक निंबाळकर

एकनाथ खडसे

शिवसेनेचे राज्यसभेचे उमेदवार संजय पवार यांचा पराभव झाल्यानंतर शिवसेनेला मोठा धक्का बसला आहे. त्यामुळे विधान परिषदेची निवडणूक शिवसेनेसाठी अधिक महत्त्वाची आहे. तर रामराजे नाईक निंबाळकरांना राष्ट्रवादीने पुन्हा उमेदवारी दिली आहे.

काँग्रेस

चंद्रकांत हंडोरे

भाई जगताप

काँग्रेसच्या आमदारांचा आकडा जर पाहिला तर भाई जगताप यांनाही धोका आहे. भाई जगताप हे महाविकास आघाडीचे पाचवे उमेदवार आहेत. त्यामुळे खरी लढत ही भाई जगताप आणि प्रसाद लाड यांच्यात आहे.