ग्रामीण महिलांना व्यवसायासाठी 20 लाख रुपयांचे कर्ज विना व्याज, विना तारण मिळणार
A PHP Error was encountered
Severity: Notice
Message: Undefined property: stdClass::$link
Filename: post/_post_share_box.php
Line Number: 27
Backtrace:
File: /home/prabo1/public_html/application/views/post/_post_share_box.php
Line: 27
Function: _error_handler
File: /home/prabo1/public_html/application/views/post/post.php
Line: 78
Function: view
File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 294
Function: view
File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 119
Function: post
File: /home/prabo1/public_html/index.php
Line: 326
Function: require_once
मुंबई (प्रबोधन न्यूज) - मुख्यमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली ग्रामविकास विभांगांतर्गत महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवन्नोंनती अभियान 'उमेद' या स्वतंत्र संस्थेची स्थापन करण्यात आलेली आहे. या अभियानाची अंमलबजावणी राज्यातील 34 जिल्हे व 351 तालुक्यात पूर्ण ताकदीने अभियान राबविले जात आहे. या योजनेअंतर्गत महिलांना स्वयंरोजगारासाठी किंवा वैयक्तिक गरजांसाठी बिनव्याजी कर्ज दिले जाते.
काय आहे उमेद योजना
महाराष्ट्र राज्यातील 71 लाख गरीब कुटुंबांना शाश्वत उपजीविकेच्या माध्यमातून गरिबीतून बाहेर काढण्यासाठी अभियान हे अभियान कटीबद्ध आहे. या माध्यमातून स्वयंसहायता गट, बचत गट याद्वारे स्त्रियांचे संघटन करून त्यांच्यातील उद्योजकतेला चालना दिली जात आहे. ‘उमेद’ या शब्दातच योजनेचा सगळा सार सामावला आहे. ‘उमेद’ ही कार्यकर्तृत्वाला चालना देणारी, मनाला उभारी देणारी गोष्ट.
महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान उमेद हा सरकारकडून राबविला जात असलेला एक नवीन महत्वाचा उपक्रम तसेच अभियान आहे. ग्रामीण भागात राहत असलेल्या स्त्रिया काही विशिष्ट हेतु उददिष्ट साध्य करण्याकरीता सर्व मिळून विविध महिला गटादवारे एकत्र येत असतात, अशा महिलांना ह्या उपक्रमातून सरकारकडून पाठबळ दिले जाते. एखाद्या विशिष्ट बचत गटाला जेवढी आवश्यकता आहे, तेवढे कर्ज बॅंकेकडून दिले जावे, खासकरून यात करण्यात आली आहे.
उमेद अभियानंतर्गत सरकार ग्रामीण भागातील तसेच तळागाळातील गरजवंत महिलांना 20 लाखांपर्यतचे कर्ज प्रदान करणार आहे. उमेद अभियानांतर्गत सरकार महिलांना जे कर्ज उपलब्ध करून देते त्यावर नाममात्र व्याज दर आकारले जाते. तर बचतगटाच्या प्रमाणे बॅंका त्यांना कर्ज देत असतात.
उमेद अभियानांतर्गत सरकार महिलांना जे कर्ज उपलब्ध करून देणार आहे. त्याकर्जासाठी महिलांना कुठल्याही प्रकारची वस्तू संपत्ती घराची जमिनीची कागदपत्रे मौल्यवान दागदागिने इत्यादी काहीही तारण ठेवावे लागणार नाही.
उमेद अभियानांतर्गत जे कर्ज महिलांना दिले जाईल. त्या कर्जाच्या रक्कमेत महिला स्वतःचा एखादा स्टार्टअप म्हणजे छोटा मोठा उद्योग व्यवसाय सुरू करू शकतील.
कर्जाची रक्कम महिला आपल्या वैयक्तिक खर्चासाठी देखील वापरू शकते
उमेद अभियानांतर्गत प्राप्त होत असलेल्या कमी व्याजदरातील कर्जाचा लाभ फक्त महिला बचत गटामधील सदस्य असलेल्या महिलाच घेवू शकतात. एवढेच नव्हे तर ही कर्जाची रक्कम महिला आपल्या वैयक्तिक खर्चासाठी देखील वापरू शकतात. राज्य शासनाच्या आदेशाप्रमाणे अणि केंद्र सरकारने ठरवलेल्या धोरणाप्रमाणे ह्या योजनेचा लाभ त्याच बचत गटाला घेता येईल ज्याची जिल्हयातील ग्रामीण विकास यंत्रणेकडे नोंद असणार आहे.
ज्या महिला बचत गटाकडून आपल्या घेतलेल्या कर्जाची वेळेवर अणि नियमितपणे परतफेड करण्यात येते. अशा महिला बचत गटाला सुमतीबाई सुकळीकर महिला सक्षमी करण योजने अंतर्गत व्याजावर अनुदान प्रदान करण्यात येते. अशा बचत गटांना शून्य टक्के व्याजदराची आकारणी करून कर्ज देखील दिले जाते.
अर्ज कोठे आणि कसा भरायचा ?
उमेद ह्या अभियानाची अधिकृत वेबसाईड www.Umed.in ही आहे. वेबसाईडवर गेल्यावर मुखपृष्ठावर 'बचत गट कर्ज प्रस्ताव' यावर क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला बॅंक लोन प्रोपजल असे इंग्रजीत लिहलेले दिसेल. याठिकाणी तुम्ही SHG प्राथमिक तपशील भरा, जसे की, नाव, गटाचे प्रमुखाचे नाव भरा, बचतगटाची सत्यापित करा, एमसीपी निवडा, बॅंक तपशील निवडा, बॅंक कर्जाबद्दल माहिती भरा.
महिलांच्या हाताला रोजगार मिळावा, यासाठी शासनाकडून योजना राबविली जाते. कर्ज दिले जाते. त्याचबरोबर महिलांनी उत्पादित केलेल्या साहित्यांची मार्केटिंग देखील शासनाच्या बेवसाईटद्वारे केली जाते. त्यासाठी उमेद मार्ट नावाचा अधिकृत वेबसाईटवर पर्याय दिलेला आहे. प्रत्येक जिल्हानिहाय यात समावेश असतो.