राज्यात सध्या एक संकट, अजित पवार यांनी व्यक्त केली चिंता
A PHP Error was encountered
Severity: Notice
Message: Undefined property: stdClass::$link
Filename: post/_post_share_box.php
Line Number: 27
Backtrace:
File: /home/prabo1/public_html/application/views/post/_post_share_box.php
Line: 27
Function: _error_handler
File: /home/prabo1/public_html/application/views/post/post.php
Line: 78
Function: view
File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 294
Function: view
File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 119
Function: post
File: /home/prabo1/public_html/index.php
Line: 326
Function: require_once
नाशिक , (प्रबोधन न्यूज ) - नाशिकमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवी, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत शासन आपल्या दारी हा कार्यक्रम होत आहे. यामध्ये अन्न पुरवठा मंत्री छगन भुजबळ, दादा भुसे, गिरीश महाजन, निलम गोऱ्हे, भारती पवार हे जिल्ह्यातील आमदारही उपस्थित आहेत. यावेळी बोलताना उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की, केंद्राच्या मदतीने राज्याला गती देण्यासाठी काम सुरू आहे. नैतिक जबाबदारी घेऊन आम्ही या सरकारमध्ये सहभागी झालोय. आता सरकार डबल इंजिन नाही तर माझे तिसरे इंजिन लागलंय. भारती ताई तुम्ही म्हणाला डबल इंजिन पण तुमची आणि माझी भावकी आहे. मुख्यमंत्री यांनी तर त्रिशूलच काढलं आहे.
सरकारी कामासाठी लाभार्थ्यांना हेलपाटे मारावे लागतात. वशिला असला तर कामे होतात. मात्र लवकरात लवकर लाभ व्हावा यासाठी हा कार्यक्रम आहे. याचा 11 लाखांपेक्षा जास्त फायदा झाला आहे. एक थोडंस संकट सध्या आहे. पावसाने ओढ दिल्याने पेरण्या रखडल्या, धरणांची स्थिती रखडली. हवामान खाते सांगत आहे पाऊस पडेल, 17 ला सुरुवात होईल. पावसासाठी पांडुरंगाकडे प्रार्थना करतो. धो धो पाऊस पडेल अशी अपेक्षा अजित पवार यांनी व्यक्त केली.
तुम्हाला एकटं सोडणार नाही, तुमच्यासोबत आहे.देशात मोदींच्या नेतृत्वाखाली कणखर नेतृत्व आहे. चांद्रयान मोहीम एक गरुड झेप आहे, जगाने दखल घेतली. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या निर्णयाचे कौतुक होत आहे असंही अजित पवार म्हणाले. खातेवाटपाबद्दल बोलताना अजित पवार यांनी म्हटलं की, खातेवाटप केले आहे, त्यात भुजबळ साहेबांना अन्न व नागरी पुरवठा खाते दिले. जाती पातीचा विचार न करता आम्ही काम करू. अर्थमंत्री म्हणून उत्तर महाराष्ट्राला मदत करू. शासन आपल्या दारी कार्यक्रमातून अनेकांना फायदा झाला. हेलपाटे मारण्याचे उद्योग करावे लागणार नाही. सरकार थेट गरजू लाभार्थ्यांना मदत करत आहे.
नाशिक-पुणे हायस्पीड रेल्वे प्रकल्प लवकरच सुरू होईल. देशाला मार्गदर्शक ठरेल अशी योजना आहे. यापूर्वी महाराष्ट्राच्या अनेक योजना देशाने अवलंबिले आहे. त्यातून कृषी क्षेत्राला मोठी मदत होईल. नाशिकच्या कामांना गती देण्यासाठी प्रयत्न करेल आणि आवश्यक निधी देईल. झोपडपट्टी मुक्त शहर करण्यासाठीचा प्रयत्न असून गोदावरीला प्रदूषण मुक्त करेल असं आश्वासनही अजित पवार यांनी दिलं.