‘लोकोत्सव महाराष्ट्र २०२२’ सोहळ्याचे आयोजन
A PHP Error was encountered
Severity: Notice
Message: Undefined property: stdClass::$link
Filename: post/_post_share_box.php
Line Number: 27
Backtrace:
File: /home/prabo1/public_html/application/views/post/_post_share_box.php
Line: 27
Function: _error_handler
File: /home/prabo1/public_html/application/views/post/post.php
Line: 78
Function: view
File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 294
Function: view
File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 119
Function: post
File: /home/prabo1/public_html/index.php
Line: 326
Function: require_once
पुणे, दि. २५ एप्रिल - मासिक ग्रामगौरव प्रकाशन व सामाजिक संस्था पुणे यांच्या संयुक्त विद्यमानाने येत्या १२ मे ते १६ मे २०२२ दरम्यान पाच दिवशीय "लोकोत्सव महाराष्ट्राचा !" हा ग्रामीण पाया असलेल्या महाप्रदर्शनाचा कार्यक्रम पुणे येथील कृषी महाविद्यालयाच्या प्रांगणात सिंचन नगर येथे आयोजित केला आहे.
"लोकोत्सव महाराष्ट्राचा!" हा गावगाड्याची संस्कृती, विचारधारा, परंपरा तसेच शेती-मातीशी नाते पट्ट करणारा पहिल्याच राज्यस्तरीय कार्यक्रमात राज्यातील महसूल विभागनिहाय जि. प. आणि पंचायत समिती पदाधिकारी, सरपंच-उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, ग्रामसेवक, पोलीस पाटील, तलाठी, शिक्षक, अंगणवाडी सेविका-मदतनिस, आशावर्कर, कृषी सहाय्यक व असे खऱ्या अर्थाने ग्रामीण भागात कार्यरत गावकारभारी सहभागी करण्याचे नियोजन आहे.
ग्रामीण महाराष्ट्राचे गाय-खोडे दाखवणारा व ग्रामीण भागाचे सूर्योदय से सूर्यास्त पर्यंतचा दिनक्रम तसेच आपल्या महाराष्ट्राच्या ऐतिहासिक, भौगोलिक, शेती व संस्कृतीची झलक "लोकोत्सव महाराष्ट्राचा!" या स्फूर्ती देणाऱ्या अभिनव कार्यक्रमातून राहणार आहे. सदर महोत्सव व प्रदर्शनात दररोज ३० ते ४० हजार प्रेक्षक संपूर्ण महाराष्ट्रातून व विशेषतः पुणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागतून निश्चितपणे सहभागी होतील. पुण्याच्या जवळपास असलेल्या नाशिक, नगर, सातारा, सांगली व पश्चिम महाराष्ट्राच्या भागातून तसेच पुणे व पिंपरी-चिंचवड महानगरातील जनसमुदाय या प्रदर्शनात उपस्थित राहतील.
कार्यक्रमात दररोज सकाळी १० वाजता प्रत्यक्ष किंवा व्हर्चुअल उद्धघाटन झाल्यानंतर पहिल्या सत्रात राज्यातील दररोज एक महसूली विभागाच्या गावनिहाय सरपंचासह त्या गावच्या ग्रामीण व्यवस्थेतील पदाधिकाऱ्यांना गावाच्या-भन्नाट गोष्टी हा प्रशिक्षणात्मक व प्रेरणा देणारा कार्यक्रम राहील, यामध्ये राज्यात विविध अभिनव हटके काम केलेल्या गावांनी राबवलेल्या योजनांची व उपक्रमांची माहिती सहभागी लोकांना दिली जाईल.
दुसऱ्या सत्रात यशाचा टप्पा गाठताना... हा विविध स्पर्धा परीक्षांना सामोरे जाणाऱ्या विद्यार्थी व उमेदवारांना तसेच नवीन उद्योग व्यवसाय आणि रोजगार स्वयंरोजगाराची वाट निवडलेल्यांना यशाचा मूलमंत्र देणारे सुप्रसिद्ध व्याख्याते प्राध्यापक गणेशजी शिंदे यांचे दररोज ५ दिवस दुपारी २ ते ४ 'प्रेरणादायी सेमिनार राहणार आहे.
दररोज सायंकाळी ६ ते ८ या दरम्यान लोकोत्सव महाराष्ट्राचा हा आपला ग्रामीण बाज ठळकपणे दाखवणारा महाराष्ट्राचा वाणा व आपली लोकधारा असलेला व सुमारे १५०-२०० कलाकारांच्या चमूने साकारलेला मुख्य कार्यक्रम सादर होईल. एकूणच, छत्रपती शिवरायांचे स्वराज्य, मराठी मुलुखाची यशोगाथा, महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री स्व. यशवंतराव चव्हाणांनी स्थापन केलेला मंगलकलश ते आजतागायत आपल्या पुरोगामी महाराष्ट्राची राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, आध्यात्मिक व अशी इत्थंभूत वाटचाल उद्धृत करणारा हा कार्यक्रम अतिशय आगळ्या व प्रभावी घाटणीचा उपक्रम रचनाबद्ध करण्यात आला आहे.
सदर लोकोत्सव महाराष्ट्राचा हा कार्यक्रम शासनाच्या विविध खात्यांच्या लोकाभिमुक्त विकास योजना व शासन संलग्न महामंडळे तसेच संस्थाकडून राबविण्यात येणारे उपक्रम थेट लोकांपर्यंत पोहचवण्याचे सुद्धा प्रभावी माध्यम ठरणार आहे. महाराष्ट्र शासनाच्या विविध खात्यांच्या योजना व कामगिरी कलाकृती, जिवंत देखावा, फोटो, आकृती किंवा ग्राफिकच्या माधमातून उपक्रमांची माहिती व सादरीकरण लोकोत्सव महाराष्ट्राचा! म्हणून या महाप्रदर्शनात होणार आहे.
तरी आपल्या सह गावातील सदस्यासह उपस्थित राहून या लोकोत्सव महाराष्ट्राचा हा सोहळ्यास सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे.