पुण्यात नासाच्या नावाने गंडा घालणाऱ्यांचा सांगलीतील 9 जणांच्या आत्महत्येशीही संबंध ?
A PHP Error was encountered
Severity: Notice
Message: Undefined property: stdClass::$link
Filename: post/_post_share_box.php
Line Number: 27
Backtrace:
File: /home/prabo1/public_html/application/views/post/_post_share_box.php
Line: 27
Function: _error_handler
File: /home/prabo1/public_html/application/views/post/post.php
Line: 78
Function: view
File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 294
Function: view
File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 119
Function: post
File: /home/prabo1/public_html/index.php
Line: 326
Function: require_once
पुणे (प्रबोधन न्यूज) - पुण्यात काही भामट्यांनी अमेरिकेतील अंतराळ संशोधन संस्था ‘नासा’च्या नावाने अनेकांना गंडा घातला असून त्यांची ६ कोटी रुपयांची फसवणूक केली आहे. रेडियोधर्मी दुर्लक्ष धातू ‘राईस पुलर’ भांड्याच्या उत्पादनात गुंतवणूक केल्यास मोठा परतावा मिळेल असे आमिष दाखवत तब्बल १०० हून अधिक नागरिकांची फसवणूक करण्यात आला आहे. फसवणुकीचे लोण हे पुण्यापुरते मर्यादित नसून राज्यभर पसल्याचे आता स्पष्ट झाले आहे. सांगलीतील म्हैसाळमध्ये 21 जून 2022 रोजी एका कुटुंबातील 9 जणांनी आत्महत्या केली होती. त्यांच्या आत्महत्येशी याच राईस पुलर घोटाळ्याशी संबंध जोडला जात आहे. अनेक नामवंत व्यक्तींनीही या राईस पुलरमध्ये पैसे गुंतवले आहेत.
9 जणांच्या आत्महत्येशी संबंधित राईस कुलर काय प्रकरण आहे
एकाच कुटुंबातील 9 जणांच्या मृत्यूने हादरलेल्या म्हैसाळ गावातील रहिवाशांनी सांगितले होते की, वनमोरे बंधूंनी तांदूळ ओढणार्याच्या भांड्यांच्या योजनेबाबत कर्ज काढून पैसे गुंतवले होते. ज्यामुळे दोन्ही भावांना कुठल्यातरी परदेशी कंपनीकडून 3000 कोटी मिळणार होते. पण ते न मिळाल्यामुळे व आपली फसवणूक झाली असल्याचे लक्षात आल्याने त्यांनी आत्महत्या केली असावी.
फसवणूक करणारे दावा करतात की, तांदूळ ओढणारा (जे भांडे, वाटी, काच किंवा पुतळ्याच्या आकारात असू शकतो) त्याच्या चुंबकीय शक्तीमुळे अत्यंत मौल्यवान आहे आणि नासासारख्या वैज्ञानिक संस्था या वस्तू उपग्रह आणि अवकाशात ऊर्जा निर्माण करण्यासाठी वापरतात. उपग्रह आणि अवकाशात ऊर्जा निर्माण करण्यासाठी करोडो रुपये खर्चून ते विकत घेतात. या लालसेपोटी लोक लाखो-कोटी रुपयांचे 'राइस पुलर' विकत घेतात, नंतर त्यांच्याकडून 'राइस पुलर' विकत घेण्यासाठी कोणतीही संस्था येत नाही. एवढेच नव्हे तर हे ठग हे विशेष धातूचे भांडे खरेदी करणाऱ्यांचा व्यवसाय आणि संपत्ती दिवसेंदिवस दुप्पट होत असल्याचेही सांगतात. ज्यांना 'राईस पुलर' चमत्कारिक म्हणतात ते देखील एक विशेष चाचणी घेतात, ज्याद्वारे ते खरे आहे की बनावट हे ओळखण्यासाठी सांगितले जाते.