अल्पवयीन प्रेमीयुगुल बाईकसह विहिरीत कोसळले, तरुणीचा मृत्यू

A PHP Error was encountered

Severity: Notice

Message: Undefined property: stdClass::$link

Filename: post/_post_share_box.php

Line Number: 27

Backtrace:

File: /home/prabo1/public_html/application/views/post/_post_share_box.php
Line: 27
Function: _error_handler

File: /home/prabo1/public_html/application/views/post/post.php
Line: 78
Function: view

File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 294
Function: view

File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 119
Function: post

File: /home/prabo1/public_html/index.php
Line: 326
Function: require_once

अल्पवयीन प्रेमीयुगुल बाईकसह विहिरीत कोसळले, तरुणीचा मृत्यू
अल्पवयीन प्रेमीयुगुल बाईकसह विहिरीत कोसळले, तरुणीचा मृत्यू

सांगली (प्रबोधन न्यूज) - सांगली जिल्ह्याच्या तासगाव तालुक्यातील अल्पवयीन प्रेमीयुगुल मध्यरात्रीच्या सुमारास दुचाकीसह विहिरीत पडल्याची घटना बुधवारी मध्यरात्री घडलीय. या घटनेत युवतीचा पाण्यात बुडून मृत्यू झाला, तर युवक बचावला. याबाबत तासगाव पोलिसात नोंद करण्यात आली आहे.

याबाब सविस्तर माहिती अशी की, तासगाव तालुक्यातले दोन वेगवेगळ्या गावात राहणारे एक प्रेमीयुगुल फिरण्यासाठी तासगाव तालुक्यातल्या पेड नजीक पर्यटन केंद्राच्या ठिकाणी गेले होते. मध्यरात्रीच्या सुमारास घरी परतत असताना या प्रेमयुगुलांच्या दुचाकीचा भीषण अपघात झाला. ज्यामध्ये अल्पवयीन तरूणीचा बुडून मृत्यू झाला, तर अल्पवयीन तरूण बचावला आहे. हे प्रेम युगुल दुचाकीवरून पेडपासून काही अंतरावर आले असता त्यांना रस्त्याचा अंदाज आला नाही आणि रात्र असल्याने काही कळण्याच्या आतच ते दोघंही दुचाकीसह थेट रस्त्याच्या कडेला असणाऱ्या विहिरीत जाऊन कोसळले.

विहिरीमध्ये कोसळल्यानंतर मुलाला पोहता येत असल्याने तो कसाबसा विहिरीतून बाहेर आला. मात्र, तो त्याच्या प्रेयसीला वाचवू शकला नाही. तर तिला पोहता येत नसल्याने तिचा विहिरीतच मृत्यू झाला. विहिरीच्याबाहेर आल्यानंतर तो तरूण निघून गेला. सदर घटनेची माहिती मिळताच तासगाव पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. तर मुलीच्याही शोधाच्या निमित्ताने नातेवाईक या ठिकाणी पोहोचले.

या घटनेबाबत तासगाव पोलिसांनी माहिती दिल्यानंतर भारती विद्यापीठ रेस्क्यू टीम घटनास्थळी पोहोचली. भारती विद्यापीठ रेस्क्यू टीमचे गजानन नरळे आणि सांगलीची HERF रेस्क्यू टीम आणि महेश कुमारमठ यांनी मृतदेह आणि मोटरसायकल तीन तासाच्या अथक प्रयत्नानंतर बाहेर काढून पोलिसांच्या ताब्यात दिला.