कासारवाडीतील भंगार मालाच्या दुकानाला मध्यरात्री भीषण आग

A PHP Error was encountered

Severity: Notice

Message: Undefined property: stdClass::$link

Filename: post/_post_share_box.php

Line Number: 27

Backtrace:

File: /home/prabo1/public_html/application/views/post/_post_share_box.php
Line: 27
Function: _error_handler

File: /home/prabo1/public_html/application/views/post/post.php
Line: 78
Function: view

File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 294
Function: view

File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 119
Function: post

File: /home/prabo1/public_html/index.php
Line: 326
Function: require_once

कासारवाडीतील भंगार मालाच्या दुकानाला मध्यरात्री भीषण आग

पिंपरी (प्रबोधन न्यूज) - पुण्यातील पिंपरी-चिंचवड येथील अल्फा कंपनी जवळील मॅक्स हॉस्पिटलच्या बाजूला असलेल्या एका भंगाराला मध्यरात्री २ च्या सुमारास भीषण आग लागली. क्षणात आगीने उग्र रूप धारण केले. आगीचे लोट दूरवर दिसत होते. या घटनेची माहिती मिळताच पिंपरी-चिंचवड महानगर पालिकेच्या अग्निशामक दलाचे बंब, खासगी कंपण्याचे बंब आणि पीएमआरडीएचे बंब असे एकूण ९ बंब घटनास्थळी दाखल झाले आहेत. आगीवर पहाटे ५ च्या सुमारास नियंत्रम मिळवण्यात यश आले आहे. सध्या कुलिंगचे काम सुरू आहे.

पिंपरी-चिंचवड येथील जुन्या मुंबई पुणे महामार्गावरील कासारवाडी येथे अल्फा कंपनी शेजारी मॅक्स हॉस्पिटल आहे. हा मोठा दवाखाना आहे. या दवाखान्याशेजारी भंगार पडलेले होते. यात टायर आणि इतर साहित्य मोठ्या प्रमाणात होते. मध्यरात्री २ च्या सुमारास या भंगार मालाला अचानक मोठी आग लागली. ही आग काही वेळातच भीषण झाली. आगीचे लोळ दूर पर्यन्त दिसत होते. ही आग दवाखान्याला देखील लागण्याची शक्यता होती. या घटनेची वर्दी मिळताच पिंपरी-चिंचववड महानगर पालिकेचे अग्निशामक दलाचे काही बंब आणि कर्मचारी हे तातडीने घटनास्थळी दाखल झाले.

दरम्यान, येथील काही कंपण्याचे बंब आणि पीएमआरडीए आगीशमक दलाचे कर्मचारी देखील घटनास्थळी दखल झाले. आगीवर नियंत्रण मिळवण्याचे काम सुरू झाले. भंगारात टायर असल्याने आगीने उग्र रूप धारण केले. धुरामुळे आगीवर नियंत्रण मिळवण्यास अडथळे येत होते. तब्बल ३ तासांच्या प्रयत्नानानंतर आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले. सध्या कुलींगचे काम सुरू असल्याही माहिती अग्निशामक दलाच्या कर्मचाऱ्यांनी दिली.

ही आग नेमकी कशामुळे लागली हे अद्याप समजू शकले नाही. शॉर्ट सर्किट मुळे ही आग लागल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. बाजूला असलेल्या मैत्री सोसायटीतील नागरिकांनी देखील आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी मोठी मदत केली.