एसबीपीआयएमला प्रतिष्ठेचे एन. बी. ए. मानांकन
A PHP Error was encountered
Severity: Notice
Message: Undefined property: stdClass::$link
Filename: post/_post_share_box.php
Line Number: 27
Backtrace:
File: /home/prabo1/public_html/application/views/post/_post_share_box.php
Line: 27
Function: _error_handler
File: /home/prabo1/public_html/application/views/post/post.php
Line: 78
Function: view
File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 294
Function: view
File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 119
Function: post
File: /home/prabo1/public_html/index.php
Line: 326
Function: require_once
पीसीईटीच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा
पिंपरी, (प्रबोधन न्यूज) - पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्टच्या (पीसीईटी) आकुर्डी येथील एस. बी. पाटील इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट (एसबीपीआयएम) या महाविद्यालयाला नॅशनल बोर्ड ऑफ ॲक्रीडिएशन (एनबीए) यांचे प्रतिष्ठेचे मानांकन प्राप्त झाले आहे, अशी माहिती पीसीईटीचे अध्यक्ष ज्ञानेश्वर लांडगे यांनी प्रसिद्धीस दिली आहे. पीसीईटीचे उपाध्यक्ष पद्मिनीताई भोसले, सचिव विठ्ठल काळभोर, खजिनदार शांताराम गराडे, विश्वस्त हर्षवर्धन पाटील कार्यकारी संचालक डॉ. गिरीष देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली एसबीपीआयएमच्या संचालिका डॉ. कीर्ती धारवाडकर तसेच डॉ. अनिश कारीया, डॉ. भूषण परदेशी, डॉ. स्वप्नाली कुलकर्णी आणि डॉ. अमरीश पद्मा यांनी यासाठी आवश्यक असणाऱ्या सर्व प्रक्रिया पूर्ण करीत समन्वयक म्हणून काम पाहिले. एनबीएचे हे ॲक्रीडिएशन शैक्षणिक २०२२-२३ ते २०२४-२५ असे तीन वर्षासाठी प्राप्त झाले आहे. पीसीईटीची स्थापना १९९० साली झाली असून, एसबीपीआयएमची स्थापना २००९ साली करण्यात आली. आज पर्यंत २००० पेक्षा जास्त विद्यार्थ्यांना एमबीएची पदवी प्रदान करण्यात आली आहे. येथे दरवर्षी १८० विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात येतो.
एसबीपीआयएम महाविद्यालय सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाशी संलग्न असून, येथे संशोधन विभाग आहे. आज पर्यंत २५ पेक्षा जास्त संशोधकांना येथून पीएचडी पदवी मिळाली आहे. तसेच ४५ संशोधक पीएचडीचे शिक्षण घेत आहेत. अनेक माजी विद्यार्थी देश विदेशात नामांकित कंपन्यांमध्ये कार्यरत आहेत. तसेच या संस्थेचे ५० पेक्षा जास्त माजी विद्यार्थी देशभरातील विविध उद्योग क्षेत्रात उद्योजक म्हणून काम पाहत आहेत. या महाविद्यालयात विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक विकासाबरोबरच सर्वांगीण विकासाकडे देखील लक्ष दिले जाते. संस्थेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांसाठी राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय स्तरावरील चर्चासत्र, परिषदा, उद्योजकता विकास कार्यक्रम, सामाजिक बांधिलकी सोबतच विविध विषयांमधील सर्टीफिकेट प्रोग्राम राबवले जातात. याचबरोबर संस्थेशी संलग्न असलेल्या अनेक नामांकित कंपन्यातील उच्चपदस्थ, अनुभवी आधिकाऱ्यांचे मार्गदर्शन विद्यार्थ्यांना उपलब्ध करून दिले जाते. येथील विद्यार्थ्यांना इंटर्नशिपसाठी आंतरराष्ट्रीय पातळीवरील नामांकित परदेशी 23 विद्यापीठांशी सामंजस्य करार करण्यात आला आहे अशीही माहिती पीसीईटीच्या वतीने प्रसिद्धीस देण्यात आली आहे.