अतिवृष्टीच्या पार्श्‍वभूमीवर पालिकेची आपत्ती निवारण यंत्रणा सज्ज

A PHP Error was encountered

Severity: Notice

Message: Undefined property: stdClass::$link

Filename: post/_post_share_box.php

Line Number: 27

Backtrace:

File: /home/prabo1/public_html/application/views/post/_post_share_box.php
Line: 27
Function: _error_handler

File: /home/prabo1/public_html/application/views/post/post.php
Line: 78
Function: view

File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 294
Function: view

File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 119
Function: post

File: /home/prabo1/public_html/index.php
Line: 326
Function: require_once

अतिवृष्टीच्या पार्श्‍वभूमीवर पालिकेची आपत्ती निवारण यंत्रणा सज्ज

पाणी शिरणाऱ्या भागासाठी अधिक सतर्कता व्हॉट्‌सऍपच्या माध्यमातून ठेवणार समन्वय

पिंपरी, (प्रबोधन न्यूज) -  पावसाचा जोर वाढत असल्यामुळे शहरातून वाहणाऱ्या पवना, मुळा व इंद्रायणीचे पात्र काही प्रमाणात वाहू लागले आहे. आगामी काळात अतिवृष्टी होऊन नदीपात्रालगत राहणाऱ्या लोकवस्तीला फटका बसू नये, यासाठी पिंपरी-चिंचवड महापालिकेने वेळीच काळजी घेतली आहे. नदीपात्रालगतच्या ठिकाणांसह शहरातील पाणी शिरणाऱ्या भागांचा सर्वे पूर्ण करुन त्याठिकाणांसाठी आपत्कालीन यंत्रणा सतर्क ठेवली आहे.

पिंपरी-चिंचवड महापालिकेकडून आपत्ती निवारण कक्ष, अग्निशामक दल, आपत्ती व्यवस्थापनासाठीचे स्वयंसेवक आदींसह सर्व क्षेत्रीय कार्यालयस्तरावर बैठका घेऊन स्वयंसेवक व कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्यात आले आहे. पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर आपत्कालीन यंत्रणा सज्ज ठेवली आहे. महापालिका स्तरावर आपत्कालीन कक्ष स्थापन असून अग्निशामक दलाकडे उपकरणे तयार ठेवली आहेत. कम्युनिटीबेस डिझास्टर मॅनेजमेंट अंतर्गत 800 स्वयंसेवकांना प्रशिक्षण दिले आहे. त्यांचा पीसीएमसी योद्धा या व्हॉट्‌सऍप ग्रुपच्या माध्यमातून सर्व ठेवला जात आहेत.

आपत्कालीन परिस्थितीची माहिती घेण्यासाठी महापालिकेच्या विविध विभागांच्या सातत्याने बैठकी घेऊन समन्वय ठेवण्यास प्राधान्य देण्यात येत आहे. नागरिकांना मदतीसाठी तत्काळ संपर्क साधता येईल यासाठी आपत्तीनिवारण कक्ष स्थापन केला आहे. आठही प्रत्येक क्षेत्रीय कार्यालयांतर्गत आपत्ती व्यवस्थापन पथक तयार करण्यात आली आहेत. स्थापत्य विभागाकडून धोकादायक इमारतींचे सर्वेक्षण करून संबंधितांना सूचना दिल्या आहेत. पाणी तुंबणे, झाड अथवा घर कोसळणे, घरांमध्ये पाणी शिरणे यांसाठी हेल्पलाइन सुरु केली आहे. आपत्ती व्यवस्थापन व नियंत्रण कक्षासह अग्निशामक यंत्रणा 24 तास कार्यरत ठेवली आहे. एनडीआरएफच्या जवानांशी संपर्क, क्षेत्रीय कार्यालयांना बॅरिकेटस्‌ उपलब्ध करुन दिली आहे. शहराच्या विविध भागातील 800 स्वयंसेवकांचा सहभाग राहणार आहे.