पुण्यातील सुधारगृहामधून अल्पवयीन कोयता गॅंग फरार

A PHP Error was encountered

Severity: Notice

Message: Undefined property: stdClass::$link

Filename: post/_post_share_box.php

Line Number: 27

Backtrace:

File: /home/prabo1/public_html/application/views/post/_post_share_box.php
Line: 27
Function: _error_handler

File: /home/prabo1/public_html/application/views/post/post.php
Line: 78
Function: view

File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 294
Function: view

File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 119
Function: post

File: /home/prabo1/public_html/index.php
Line: 326
Function: require_once

पुण्यातील सुधारगृहामधून अल्पवयीन कोयता गॅंग फरार

पुणे (प्रबोधन वृत्तसेवा) - पुण्यात कोयता गॅंगने धुमाकूळ घातला आहे. पुण्यात ही गॅंग रोज अनेक गुन्हे करत आहे. या घटना रोखण्यासाठी पुणे पोलिसांनी प्रतिबंधात्मक कारवाईला सुरुवात केली आहे. अशीच एक कारवाई करत अट्टल आरोपी असलेल्या सात आरोपींना अटक करून त्यांना येरवडा येथील पुण्यातील पंडित जवाहरलाल नेहरू उद्योग केंद्र या सुधारगृहात पाठवण्यात आले होते.

दरम्यान, या सुधार गृहाच्या संरक्षण भिंतीला शिडी लावून भिंतीवरून उड्या मारून या सात आरोपींनी पळ काढला आहे. ही घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे. अल्पवयीन मुलांना पळून जाण्यासाठी मदत करणाऱ्या एका सराइताविरोधात येरवडा पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

या प्रकरणी सौरभ शिवाजी वायदंडे (वय १८, रा. भोसले व्हिलेज, भेकराईनगर, हडपसर) याच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत संतोष किसन कुंभार (वय ४६) यांनी येरवडा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. येरवड्यात पंडित जवाहरलाल नेहरू उद्योग केंद्राचे निरीक्षण गृह आहे. गंभीर गुन्हे करणाऱ्या अल्पवयीन मुलांना बालन्याय मंडळाच्या आदेशाने निरीक्षणगृहात ठेवण्यात येते.

हडपसर भागात कोयते उगारून दहशत माजविणाऱ्या सात अल्पवयीन मुलांविरोधात हडपसर पोलिसांनी कारवाई केली होती. त्यानंतर बालन्याय मंडळाच्या आदेशाने अल्पवयीन मुलांची रवानगी पंडित जवाहरलाल नेहरू उद्योग केंद्रातील निरीक्षणगृहात करण्यात आली होती. अल्पवयीन मुले निरीक्षण गृहातील सीमाभिंतीवर शिडी लावून चढले. भिंतीवरून उड्या मारून पसार झाले. पसार झालेल्या अल्पवयीन मुलांचा शोध घेण्यात येत आहे. परिमंडळ चारचे पोलीस उपायुक्त रोहिदास पवार यांनी घटनास्थळी भेट दिली. पोलीस उपनिरीक्षक काटे तपास करत आहेत.