पंतप्रधान मोदी मला संपवू शकत नाहीत; पंकजा मुंडेंचे मोदींनाच आव्हान
A PHP Error was encountered
Severity: Notice
Message: Undefined property: stdClass::$link
Filename: post/_post_share_box.php
Line Number: 27
Backtrace:
File: /home/prabo1/public_html/application/views/post/_post_share_box.php
Line: 27
Function: _error_handler
File: /home/prabo1/public_html/application/views/post/post.php
Line: 78
Function: view
File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 294
Function: view
File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 119
Function: post
File: /home/prabo1/public_html/index.php
Line: 326
Function: require_once
बीड, (प्रबोधन वृत्तसेवा) - बीड जिल्ह्याच्या अंबाजोगाई येथे आयोजित "समाजातील बुद्धिजिवी लोकांच्या सोबत संवाद" या कार्यक्रमाच्या प्रमुख मार्गदर्शन म्हणून भाजपाच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केलं यावेळी खासदार प्रीतम मुंडे यांची विशेष उपस्थिती होती. या प्रसंगी उपस्थितांना मार्गदर्शन करताना पंकजा मुंडे यांनी काँग्रेस पक्षात वंशवादाचे राजकारण सुरू आहे, असं पंकजा मुंडे म्हणाल्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना देशातील वंशवादाचे राजकारण संपवायचे आहे, असं पंकजा मुंडे यांनी म्हटलं. पंकजा मुंडे यांनी यापुढे थोडा वेळ थांबून यामध्ये मी सुद्धा वंशवादाचे प्रतीक आहे पण मला कोणी संपवू शकतं नाही, असं म्हटलं.
त्या म्हणाल्या की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना वंशवादाचं राजकारण संपवायचं आहे. मी सुद्धा वंशवादाचं प्रतीक आहे मात्र मला कोणी संपवू शकत नाही, मोदीजींनी ठरवून सुद्धा मला संपवायचा प्रयत्न केला तर ते सुद्धा मला संपवू शकत नाहीत. जर मी तुमच्या मनावर राज्य केले तर ते तसं करु शकणार नाहीत, असं पंकजा मुंडे बोलताना म्हणाल्या.
बीड जिल्ह्याचा विकास होण्यासाठी पंकजा ताई या मागच्या पाच वर्षात पालकमंत्री असताना त्यांनी जिल्ह्यात राष्ट्रीय महामार्ग आणले, रेल्वे आणली, मोठे उद्योग सुरू करण्यासाठी हे महत्वाचे असते. आता परत बीडच्या पालकमंत्री पंकजा ताई झाल्या तर राहिलेला विकास सुद्धा पूर्ण होणार आहे, असं म्हणत खासदार डॉ. प्रीतम मुंडे यांनी पंकजा मुंडे यांना बीडच्या पालकमंत्री होण्याच्या शुभेच्छा दिल्या.