महापालिकेतील भ्रष्टाचाराच्या आरोपामुळे भाजप अडचणीत महापालिकेतील भ्रष्टाचाराच्या आरोपामुळे भाजप अडचणीत 

A PHP Error was encountered

Severity: Notice

Message: Undefined property: stdClass::$link

Filename: post/_post_share_box.php

Line Number: 27

Backtrace:

File: /home/prabo1/public_html/application/views/post/_post_share_box.php
Line: 27
Function: _error_handler

File: /home/prabo1/public_html/application/views/post/post.php
Line: 78
Function: view

File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 294
Function: view

File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 119
Function: post

File: /home/prabo1/public_html/index.php
Line: 326
Function: require_once

महापालिकेतील भ्रष्टाचाराच्या आरोपामुळे भाजप अडचणीत महापालिकेतील भ्रष्टाचाराच्या आरोपामुळे भाजप अडचणीत 


योगेश बहल, संजोग वाघेरे वाघेरे या नेत्यांचा पुढाकार; गरज सामूहिक नेतृत्त्वाची 

पिंपरी  - पिंपरी-चिंचवड महापालिकेची निवडणूक अवघ्या चार महिन्यांवर येऊन ठेपल्यानंतर राष्ट्रवादीने महापालिकेतील एकापाठोपाठ एक भ्रष्टाचार उघडकीस आणण्यास सुरुवात केल्यामुळे सत्ताधारी भाजपासमोर अडचणी निर्माण होण्यास सुरुवात झाली आहे. राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे यांच्यासह माजी महापौर योगेश बहल यांनी घेतलेल्या या भूमिकेचा राष्ट्रवादीला निवडणुकीत फायदा होण्याची शक्‍यता वर्तविली जात आहे. 

पिंपरी-चिंचवड महापालिकेची सार्वत्रिक निवडणूक अवघ्या चार महिन्यांवर आली आहे. सर्वच पक्षांमध्ये शहर पातळीवर अद्यापपर्यंत शांतता असली तरी राष्ट्रवादीच्या काही नेत्यांनी मात्र महापालिकेतील निविदा प्रक्रियेतील भ्रष्ट कारभार जनतेसमोर आणण्यास सुरुवात केली आहे. गतवेळी जी भूमिका भाजपाने घेतली होती तशीच भूमिका राष्ट्रवादीकडून घेतल्याचे पहावयास मिळत आहे. स्मार्ट सिटीतील घोटाळ्यानंतर आता वैद्यकीय विभागातील कर्मचारी पुरविण्याच्या कामात झालेल्या "बोगसगिरी'चा पोलखेल बहल यांनी केल्यामुळे खळबळ उडाली आहे. गेल्या साडेचार वर्षांपासून सत्ताधाऱ्यांच्या विरोधात राष्ट्रवादी आक्रमक नसल्याचा आरोप होत होता मात्र गेल्या चार ते पाच महिन्यांतील राष्ट्रवादीतील नेत्यांच्या आक्रमक भूमिकेचा पक्षाला किती फायदा होणार हे पहावे लागणार आहे. 

एका बाजूला राष्ट्रवादीतील दोन ते तीन नेते आक्रमक भूमिका घेत असले तरी विरोधी पक्षनेत्यांसह काही नेत्यांनी सत्ताधाऱ्यांच्या विरोधात कोणतीच भूमिका घेतलेली नसल्याने त्याची चर्चाही पालिका वर्तुळात रंगली आहे. सध्या शहर पातळीवर सर्व गटांना एकत्र आणण्याचे कसब नसणारे सामूहिक नेतृत्त्व नसल्यामुळे शहर राष्ट्रवादीमध्ये गोंधळाचे वातावरण दिसत आहे. शहर पातळीवर जुन्या- नव्यांना एकत्र आणणारे नेतृत्त्व मिळाल्यास महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीत पक्ष मोठ्या ताकदीने निवडणुकीला सामोरे जाऊ शकतो. त्यासाठी अजित पवारांनीच भूमिका घेण्याची गरज व्यक्त होत आहे. 

निवडणुकीत फायदा? 
एकापाठोपाठ एक भ्रष्टाचाराची प्रकरणे उघडकीस येत असल्याने त्याचा फायदा राष्ट्रवादीला होईल, अशी चर्चा रंगली आहे. या भ्रष्टाचाराबाबत भाजपाने अद्यापपर्यंत कोणतीच प्रतिक्रिया न देता प्रशासनावर खापर फोडण्याची भूमिका घेतली आहे. सर्वसामान्य जनतेतूनही याबाबत आता प्रतिक्रया उमटू लागल्याने त्याचा फायदा राष्ट्रवादीला निवडणुकीत होणार ते पहावे लागणार आहे.