कॉम्प्युटर स्लो झालाय ? पुढील टीप्स फॉलो करा

A PHP Error was encountered

Severity: Notice

Message: Undefined property: stdClass::$link

Filename: post/_post_share_box.php

Line Number: 27

Backtrace:

File: /home/prabo1/public_html/application/views/post/_post_share_box.php
Line: 27
Function: _error_handler

File: /home/prabo1/public_html/application/views/post/post.php
Line: 78
Function: view

File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 294
Function: view

File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 119
Function: post

File: /home/prabo1/public_html/index.php
Line: 326
Function: require_once

कॉम्प्युटर स्लो झालाय ? पुढील टीप्स फॉलो करा

कॉम्प्यूटर स्लो झाल्याने तुमच्या कामात आलेल्या व्यत्ययामुळे टेन्शन येणे स्वाभाविक आहे. मायक्रोसॉफ्ट वर्डमध्ये डॉक्यूमेंटर डिझाईन करायचे असले अथवा VLC वर मुव्ही पाहायचा असेल, अथवा एखादा पीसी स्लो झाला तर अनेक लोक चिडतात. अशावेळी अनेक वेळा कॉम्प्यूटर फॉरमॅट करावा लागतो. मात्र काही वेळा सोप्या टीप्स फॉलो करून तुमच्या सिस्टीमचा स्पीड वाढवू शकता येतो. तुम्हाला अशाच काही साधारण टीप्स बद्दल सांगणार आहे ज्यामुळे तुमचे कॉम्प्यूटर वेगात चालायला लागेल.

स्टार्टअप कमी करा -

अनेकवेळा युजर आपल्या सिस्टीमवर स्टार्टअप प्रोग्रॅम्सला जास्तीत जास्त इन्स्टॉल करतात. अशावेळी कॉम्प्यूटरची स्पीड कमी होते. ज्या लोकांना स्टार्टअपबद्दल माहिती नाही त्यांच्यासाठी, स्टार्टअप प्रोग्रॅम एक असा प्रोगॅम असतो ज्यामुळे कॉम्प्यूटर सुरू होताच आपोआप सुरू होतो. यामध्ये अनेक विजेट्स उदा. एनालॉग क्लॉक, स्क्रीन न्यूज फीड, जी-टॉक, स्काईप, बिट टोरंट यांसारख्या प्रोग्रॅमचा समावेश आहे. हे प्रोग्रॅम युजर्स अनेकवेळा वापरतात.

कसे कराल अनइन्स्टॉल 

* स्टार्ट मेनुवर जाऊन रन कमांड निवडा. अथवा 'windows key + R' वर क्लिक करा

* त्यानंतर जी विंडो ओपन होईल त्यामध्ये "msconfig" लिहून एन्टर दाबा

* येथे स्टार्टअप (Start Up) टॅबवर क्लिक करा आणि ज्या प्रोग्रॅम्सचा तुम्ही वापर करत नाही त्यांना त्या लिस्टमधून डीलिट करा.

C ड्राईव रिकामी ठेवा -

कॉम्प्यूटरमधील C ड्राइव सर्वात महत्त्वाचा ड्राइव असतो. हार्ड डिस्कच्या या भागात सर्वात आवश्यक सॉफ्टवेअर असतात, ज्यांच्याशिवाय तुमचे कॉम्प्यूटर चालत नाही. या ड्राइववर जास्त डाटा ठेवू नका. जे अनावश्यक प्रोग्रॅम अथवा सॉफ्टवेअर आहेत त्यांना दुसऱ्या ड्राइववर इंस्टॉल करा. कोणताही पर्सलन डाटा सी ड्राइववर ठेवू नका.

गेमिंग कॉम्प्यूटरसाठी करा ग्राफीक्स ड्रायव्हर अपग्रेड -

जर तुम्हाला HD गेम्सची आवड आहे तर थोडे तांत्रिक, मात्र कामाचा उपाय तुमच्या स्लो पीसीला फास्ट करू शकतो. गेमर्ससाठी सर्वात आवश्यक आहे ते म्हणजे पीसी ड्रायव्हर अपग्रेड करणे. ड्रायव्हर म्हणजे ते खास प्रोग्रॅम असतात ज्यामुळे कोणत्याही हार्डवेअरला चालण्यास सहाय्य करतात. कॉम्प्यूटर विकत घेताना जे ड्रायव्हर्स येतात ते काही काळानंतर जूने होतात.

तुमच्या ड्रायव्हरच्या हिशोबाने कोणत्याही वेंडरकडून ड्रायव्हर अपग्रेड केले जाऊ शकतात. यात पीसीमध्ये AMD, nVidia अथवा इंटेल ज्याचे ग्राफीक्स प्रोसेसर असेल त्याहिशोबाने ते अपग्रेड करावे लागते. यामुळे गेम खेळताना पीसी कधीच हॅँग होणार नाही.

एकापेक्षा जास्त अँटीव्हायरस ठेवू नका -

वाढत्या तंत्रज्ञात व्हायरसच्या प्रसारामुळे अँटीव्हायरस अत्यावश्यक आहे. मात्र पीसीच्या हिशोबाने केवळ एकच रजिस्टर्ड अँटीव्हायरस कॉम्प्यूटरमध्ये ठेवावा. अशा वेळी दोन प्रोग्रॅम अथवा इतर कोणतेही फायरवॉल प्रोग्रॅम इन्स्टॉल केल्याने कॉम्प्यूटर स्लो होतो. अँटीव्हायरस अथवा फायरवॉल प्रोग्रॅम खुपच मेमरी घेतात यामूळे दोन प्रोग्रॅम सोबतच काम करायला लागल्यास कॉम्प्यूटरचा वेग कमी होतो.

करप्ट फाईल स्कॅन करा  -

कॉम्प्यूटरचे ऑपरेटींग सिस्टीम नेहमी पीसीच्या सिस्टिम फाईल्समध्ये बदल करत असतो. यामध्ये अनेक फाईल्स अशा असतात ज्या सिस्टीम अपडेट नंतर करप्ट होतात. अशा वेळी या फाईल्स निकामी होतात. मात्र तरीही जागा अडवून बसतात. त्यावेळी अशा फाईल्सला डिलीट अथवा रिपेअर करावे.

हार्डवेयरकडे लक्ष द्या  -

जर तुमचा पीसी खुपच जुना झाला आहे तर त्याचे हार्डवेअर बदलणे आवश्यक आहे. यामध्ये रॅम वाढवता येऊ शकते. केबल बदलता येऊ शकतात. हार्डडिस्क वाढवणे इ. जर तुमचा पीसी वारंवार हँग होत असेल तर एखाद्या टेक्निशीअनला बोलावून संपूर्ण हार्डवेअर तपासून घ्या. सॉफ्टवेअरही तपासून घ्या. जर विंडोज XP असेल तर ते बदलून त्याजागी 7 अथवा 8 इंस्टॉल करा.

डेस्कटॉप ठेवा स्वच्छ -

जर तुम्ही तुमच्या कॉम्प्यूटरला बूस्ट करणार असाल तर त्यासाठी तुम्हाला तुमचा डेस्कटॉप स्वच्छ करणे आवश्यक आहे. जेवढ्या जास्त फाईल्स डेस्कटॉपवर सेव्ह असतील तेवढीच जास्त मेमरी खर्च होईल. कारण डेस्कटॉप नेहमी काम करत असते. डेस्कटॉपवर सेव्ह झालेल्या फाईल्स कॉम्प्यूटरच्या  C ड्राइववर सेव होतात आणि यामुळे रॅमवर जास्त जोर पडतो. यामुळे तुमच्या फाईल्स डेस्कटॉपवर सेव न करता इतर कोणत्याही ड्राइववर सेव्ह करा.

रजिस्टर्ड अँटीवायरसचा करा वापर -

इंटरनेटच्या मदतीने अनेक वायरस आणि मालवेअर पीसीत येऊ शकतात. यामुळे पीसीचा स्पीड कमी होऊ शकतो. यासाठी नेहमी रजिस्टर्ड अँटीव्हायरसचा वापर करावा. तसेच महिन्यातून अथवा आठवड्यातून एक दिवस संपूर्ण पीसी स्कॅन करावा.

निकमी सॉफ्टवेअर आणि व्हिज्यूअल्स काढून टाका -

पीसीमध्ये असे कोणतेही सॉफ्टवेअर इंस्टॉल करू नका जे तुम्ही कधीच वापरत नाही आणि असे कोणते सॉफ्टवेअर असेल तर ते ही डीलीट करा. यासोबतच एनिमेशन इफेक्ट्स, व्हीज्यूअल्स, स्क्रीन सेव्हर, ह्या गोष्टी जरी तुम्हाला आवडत असतील तरी त्या पीसी स्लो करतात. त्यामुळे त्यांनाही अनइंस्टॉल करा.