सहलीसाठी गेलेली शाळेची बस दरीत कोसळली; सुदैवाने जीवितहानी नाही

A PHP Error was encountered

Severity: Notice

Message: Undefined property: stdClass::$link

Filename: post/_post_share_box.php

Line Number: 27

Backtrace:

File: /home/prabo1/public_html/application/views/post/_post_share_box.php
Line: 27
Function: _error_handler

File: /home/prabo1/public_html/application/views/post/post.php
Line: 78
Function: view

File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 294
Function: view

File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 119
Function: post

File: /home/prabo1/public_html/index.php
Line: 326
Function: require_once

सहलीसाठी गेलेली शाळेची बस दरीत कोसळली; सुदैवाने जीवितहानी नाही

पुणे, (प्रबोधन न्यूज) - आंबेगाव तालुक्यातील पिंपळगाव तर्फे घोडा येथील मुक्ताई प्रशालेचे विद्यार्थी गिरवली येथील आयुकाची दुर्बिण पाहायला गेले होते. दरम्यान परत येत असताना ही बस दरीत कोसळली. या बसमध्ये ४४ विद्यार्थी आणि ३ शिक्षक होते. सुदैवाने या घटनेत जीवितहानी झाली नाही. मात्र, काही विद्यार्थी जखमी झाले आहेत. जखमी विद्यार्थ्याना मंचर येथील उपजिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आहे आहे. ही दुर्घटना आज दुपारी अडीचच्या सुमारास घडली आहे.

आंबेगाव तालुक्यात गिरीवली येथे आयूकाची दुर्बिण आहे. गिरवली हे उचं डोंगरावर वसले आहे. येथे जाणार रस्ता हा तीव्र वळणाचा आहे. ही दुर्बिण पाहण्यासाठी आंबेगाव तालुक्यातील पिंपळगाव तर्फे घोडा येथील मुक्ताई प्रशालेची सहल सकाळी गेली होती. एका बस मधून तब्बल ४४ विद्यार्थी आणि ३ शिक्षक हे ही दुर्बिण पाहण्यासाठी गेले होते. दरम्यान ही दुर्बिण पाहून झाल्यावर विद्यार्थी हे बस मधून परत खाली येत असताना चालकाचे बस वरील नियंत्रण सुटले. यामुळे ही बस थेट दरीत जाऊन कोसळली. या घटनेत सुदैवाने जीवित हानी झाली नाही. या घटनेची माहिती मिळताच प्रशासन आणि पोलिस तातडीने घटनास्थळी पोहचले. त्यांनी तातडीने बस मधून मुलांना बाहेर काढले.

या घटनेत काही विद्यार्थी जखमी झाले आहेत. त्यातील ८ विद्यार्थी हे गंभीर असून त्यांना उपचारासाठी मंचर येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. घटनास्थळी बचाव कार्य सुरू असून काही मुलांना ग्रामीण रुग्णालय घोडेगाव येथे दाखल करण्यात आले आहे. त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.