भटक्या कुत्र्यांच्या बंदोबस्तासाठी मारूती भापकर यांचे आयुक्तांना साकडे

A PHP Error was encountered

Severity: Notice

Message: Undefined property: stdClass::$link

Filename: post/_post_share_box.php

Line Number: 27

Backtrace:

File: /home/prabo1/public_html/application/views/post/_post_share_box.php
Line: 27
Function: _error_handler

File: /home/prabo1/public_html/application/views/post/post.php
Line: 78
Function: view

File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 294
Function: view

File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 119
Function: post

File: /home/prabo1/public_html/index.php
Line: 326
Function: require_once

भटक्या कुत्र्यांच्या बंदोबस्तासाठी मारूती भापकर यांचे आयुक्तांना साकडे

पिंपरी-चिंचवड, दि. 11 मे – मोहननगर, महात्मा फुलेनगर, आनंदनगर, इंदिरानगर, साईबाबानगर, चिंचवडस्टेशन, काळभोरनगर, रामनगर, दत्तनगर, विद्यानगर, शंकरनगर, परशुरामनगर आदी परिसरात मोकाट कुत्र्यांचा प्रचंड वावर असून त्यामुळे येथील विद्यार्थी महिला ज्येष्ठ नागरिक कामगार यांच्या जीविताला धोका निर्माण झाला आहे. या परिसरात मोकाट कुत्री रात्रीच्या वेळेस खूप जोरात भुकंतात त्यामुळे रात्रीच्या वेळेस नागरिकांचा निद्रानाश होतो लहान मुले दचकून घाबरून जागे होतात. ही मोकाट कुत्री लहान मुले, महिलांच्या अंगावर गुरगुरत धावून येतात त्यामुळे या परिसरात भीतीचे वातावरण आहे.

तसेच या परिसरात सेकंड व थर्ड शिफ्टला कंपनीत कामाला जाणाऱ्या येणाऱ्या कामगारांच्या वाहनांच्या मागे ही कुत्री लागतात. त्यामुळे वाहने जोरात पळवावी लागतात. यामुळे यापूर्वी अनेक लहान-मोठे अपघात झाले आहेत. यापुढे मोठा अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे आम्ही आपणास विनंती करतो की आपण या गंभीर प्रकरणात स्वतः लक्ष घालून संबंधित विभागाला याबाबत योग्य उपाय योजना राबवण्याबाबत सक्त आदेश देऊन आमच्या विभागातील या समस्यांचे निराकरण करावे. आशा आशियाचे पत्र दि.११/८/२०२२ दिले होते. मात्र त्यावर आपण व आपल्या पशुवैद्यकीय विभागाने कुठलीही दखल घेऊन उपाय योजना राबवल्या नाहीत.

त्यामुळेच सोमवार दि.९/८/२०२२ रोजी संध्याकाळी आमच्या मित्राची पत्नी व मुलगा मोहननगर मधून दुचाकी वाहनावर चाललेले असताना त्यांच्यामागे तीन कुत्री लागले. ते दोघे हि जोरात रस्त्यावर खाली पडले. दोघांना जबर मार लागला. नशिबाने त्यांचे प्राण वाचले. आमच्या या मित्राच्या पत्नीचा हात व पाय फॅक्चर झाल्यामुळे त्यावर शस्त्रक्रिया करावी लागली. हे केवळ पशुवैद्यकीय विभागाच्या गलथान व भ्रष्ट कारभारामुळे घडले आहे. त्यामुळे संबंधित यातील दोषींवर कठोर कारवाई करून या समस्याचे समूळ उच्चाटन करण्यासाठी आपण हे प्रकरण गांभीर्याने घेऊन योग्य त्या उपाय योजना तातडीने त्वरित राबवाव्यात ही विनंती. अन्यथा आम्हाला आपल्या विरुद्ध कायदेशीर व आंदोलनात्मक मार्ग स्वीकारावा लागेल कृपया याची नोंद घ्यावी असे पत्र सामाजिक कार्यकर्ते मारूती भापकर यांनी पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेचे आयुक्त राजेश पाटील यांना दिले आहे.