पीएमआरडीएकडून 14 रो-हाऊसेसचा ई-लिलाव 1 कोटी 26 लाख रुपये किंमत

A PHP Error was encountered

Severity: Notice

Message: Undefined property: stdClass::$link

Filename: post/_post_share_box.php

Line Number: 27

Backtrace:

File: /home/prabo1/public_html/application/views/post/_post_share_box.php
Line: 27
Function: _error_handler

File: /home/prabo1/public_html/application/views/post/post.php
Line: 78
Function: view

File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 294
Function: view

File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 119
Function: post

File: /home/prabo1/public_html/index.php
Line: 326
Function: require_once

पीएमआरडीएकडून 14 रो-हाऊसेसचा ई-लिलाव 1 कोटी 26 लाख रुपये किंमत

पिंपरी,  (प्रबोधन न्यूज )- मोशी येथे पेठ क्रमांक 6 मध्ये पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (पीएमआरडीए) विकसित केलेले 14 रो-हाऊस भाडेपट्ट्याने देण्यात येणार आहे. रो-हाऊसची किंमत 1 कोटी 26 लाखापर्यंत असून पुढील महिन्यात (दि. 31 ऑगस्ट) त्यासाठी ई-लिलाव प्रक्रिया राबविण्यात येणार आहे, अशी माहिती पीएमआरडीएचे उपजिल्हाधिकारी तथा जनसंपर्क अधिकारी रामदास जगताप यांनी दिली.

हवेली तालुक्‍यातील मौजे मोशी, पेठ क्रमांक 6 येथील भूखंड क्रमांक 87 ते 104 येथील गृहयोजना क्रमांक 3 मध्ये 14 रो-हाऊसेस विकसित केले आहेत. रो-हाऊसच्या भूखंडाचे क्षेत्रफळ कमीत कमी 190.86 चौरस मीटर व जास्तीत जास्त 251.53 चौरस मीटर आहे. रो-हाऊसची विक्री किंमत कमीत कमी 1 कोटी 11 लाख 37 हजार 320 आणि जास्तीत जास्त 1 कोटी 26 लाख 6 हजार 748 एवढी आहे. रो-हाऊसच्या किंमतीत 2 टक्के अनामत रक्कम व फॉर्म शुल्क 5 हजार रुपये असणार आहेत.

रो-हाऊस वाटप करण्यासाठी घेण्यात येणा-या ई-लिलाव प्रक्रियेत सहभागी होण्यासाठी लिलावधारकांना https://eauction.gov.in या संकेतस्थळावर 11 जुलै ते 10 ऑगस्ट सायंकाळी पाचपर्यंत नाव नोंदणी करावी लागेल. संपूर्ण लिलाव प्रक्रिया ऑनलाइन पध्दतीने याच संकेतस्थळावर राबविण्यात येणार आहे. 31 ऑगस्ट रोजी ई-लिलाव प्रक्रिया हाती घेण्यात येणार आहे. त्याची संपूर्ण माहिती प्राधिकरणाच्या संकेतस्थळावर (https://pmrda.gov.in) उपलब्ध करुन देण्यात आली आहे. इच्छुकांनी लिलाव प्रक्रियेत सहभागी व्हावे, असे आवाहन प्राधिकरणाचे महानगर आयुक्त राहुल महिवाल यांनी केले आहे.