हा प्राणी सर्वात जास्त काळ पृथ्वीवर राहतो, वय जाणून तुम्हाला आश्चर्य वाटेल !

A PHP Error was encountered

Severity: Notice

Message: Undefined property: stdClass::$link

Filename: post/_post_share_box.php

Line Number: 27

Backtrace:

File: /home/prabo1/public_html/application/views/post/_post_share_box.php
Line: 27
Function: _error_handler

File: /home/prabo1/public_html/application/views/post/post.php
Line: 78
Function: view

File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 294
Function: view

File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 119
Function: post

File: /home/prabo1/public_html/index.php
Line: 326
Function: require_once

हा प्राणी सर्वात जास्त काळ पृथ्वीवर राहतो, वय जाणून तुम्हाला आश्चर्य वाटेल !

नवी दिल्ली -

पृथ्वीवर माणसांशिवाय असंख्य पशु-पक्षीही  राहतात. येथे विविध प्रजातींचे प्राणी आढळतात. काही महासागराच्या खोलात राहतात, काही पृथ्वीवर, तर काही अनंत आकाशात उडतात. प्रत्येक सजीवाची स्वतःची खासियत असते. रंग, आकार, गुणवत्ता आणि अन्न हेच प्रत्येक जीवाला एकमेकांपासून वेगळे करतात. त्याचप्रमाणे प्रत्येक सजीवाचे आयुष्य वेगवेगळे असते. काही शेकडो वर्षे जगतात तर काही अगदी काही क्षण ! आज आपण अशाच एका प्राण्याविषयी जाणून घेणार आहोत जो आपल्या दीर्घायुष्यासाठी जगभर ओळखला जातो. स्वभावाने शांत असलेला हा प्राणी समुद्राच्या खोल आणि जमिनीवरही आढळतो. चला जाणून घेऊया कोण आहे एवढं आयुष्य जगणारा प्राणी.. 
 
जगातील सर्वात जास्त काळ जगणारा प्राणी कासव आहे. होय ! कासव हा पृथ्वीवरील कोणत्याही प्राण्यापेक्षा जास्त काळ जगणारा प्राणी आहे. या प्राण्याचे सरासरी आयुर्मान 150 ते 200 वर्षांपर्यंत असते. तुम्हाला जगातील सर्वात जुन्या कासवाबद्दल माहिती आहे का? आज आपण ज्या कासवाबद्दल बोलणार आहोत त्या कासवाचे वय इतके आहे की शास्त्रज्ञही त्याच्या वयाबद्दल संभ्रमात आहेत.

जोनाथन असे या कासवाचे नाव असून या कासवाला जगातील सर्वात वृद्ध प्राणी अशी पदवी मिळाली आहे. हे कासव दक्षिण अटलांटिक महासागरातील सेंट हेलेना बेटावर आढळते. हे त्याच्या वयासाठी जगभर प्रसिद्ध आहे.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, जोनाथनचा जन्म 1832 मध्ये झाला होता. अशा स्थितीत त्याचे वय 2022 मध्ये 190 वर्षे झाले आहे. 1882 मध्ये, जोनाथन 50 वर्षांचा होता तेव्हा त्याला सेंट हेलेना येथे आणण्यात आले. "सर्वात वृद्ध प्राणी" म्हणून जोनाथनचे नाव गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंदवले गेले आहे.

हे कासव शाकाहारी असून त्याला आपल्या आहारात कोबी, काकडी, गाजर, सफरचंद, केळी आणि हंगामी फळे खायला आवडतात. हिवाळ्यात सूर्यस्नान करणे आणि उन्हाळ्यात सावलीत राहणे आवडते. मात्र, वाढत्या वयाचा परिणामही त्यावर दिसून येत आहे. त्याची दृष्टी कमकुवत झाली आहे आणि वास घेण्याची शक्तीही कमी झाली आहे. त्यांची प्रकृती सध्या तशी नाजूक असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. मात्र तो अजूनही दीर्घ आयुष्य जगेल, अशी अशा आहे.