पिंपरी-चिंचवड महापालिकेतील अधिकाऱ्यांच्या बदल्या, बढत्यांचा धडाका
A PHP Error was encountered
Severity: Notice
Message: Undefined property: stdClass::$link
Filename: post/_post_share_box.php
Line Number: 27
Backtrace:
File: /home/prabo1/public_html/application/views/post/_post_share_box.php
Line: 27
Function: _error_handler
File: /home/prabo1/public_html/application/views/post/post.php
Line: 78
Function: view
File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 294
Function: view
File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 119
Function: post
File: /home/prabo1/public_html/index.php
Line: 326
Function: require_once
पिंपरी, (प्रबोधन न्यूज) - स्थापत्य विभागातील वरिष्ठ अधिका-यांच्या बदल्या केल्यानंतर महापालिका आयुक्त तथा प्रशासक राजेश पाटील यांनी आता स्थापत्य विभागातील 27 उपअभियंत्यांच्या अंतर्गत बदल्या केल्या आहेत. तर, 17 कनिष्ठ अभियंत्यांना उपअभियंतापदी बढती दिली आहे. परंतु, कनिष्ठ अभियंत्यांची कमतरता असल्याने कनिष्ठ अभियंत्यासह उपअभियंतापदाचे काम बढती मिळालेल्या अभियंत्यांना करावे लागणार आहे.
मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार पिंपरी-चिंचवड महापालिका आस्थापनेवरील अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या बदल्या करण्याचे धोरण 2011 साली तयार करण्यात आले आहे. एकाच विभागात तीन वर्षे सेवा पूर्ण करणारे अधिकारी व कर्मचा-यांच्या दरवर्षी एप्रिल व मे महिन्यात अंतर्गत बदल्या केल्या जातात. परंतु, तत्कालीन महाविकास आघाडी सरकारने 30 जून पर्यंत बदल्यांना स्थगिती दिली होती. यामुळे यंदा अंतर्गत बदल्या झाल्या नव्हत्या. महापालिकेने राज्य सरकारकडे मार्गदर्शन मागविले होते. दरम्यान, 30 जून रोजी महाविकास आघाडी सरकार कोसळले. त्यानंतर प्रशासनाने जुलै महिन्यात अंतर्गत बदल्या करण्यास सुरुवात झाली. महापालिका प्रशासन टप्प्या-टप्प्याने बदल्या करत आहे.
महापालिका कामकाजाच्या सोईच्या दृष्टीने स्थापत्य विभागातील 27 उपअभियंत्यांच्या अंतर्गत बदल्या करण्यात आल्या आहेत. उपअभियंत्यांनी बदली दिलेल्या विभागात आज (शुक्रवार) पर्यंत रुजू व्हावे. रुजू अहवालाची प्रत प्रशासन विभागाकडे पाठवावी. आदेशाच्या 15 दिवसांच्या आत लेखी स्वरुपात कार्यभार हस्तांतरण करावे. तसा अहवाल संबंधित विभागप्रमुखांना द्यावा. अन्यथा कारवाई केली जाईल, असा इशारा आयुक्त पाटील यांनी दिला आहे.
महापालिकेतील स्थापत्या विभागातील 17 कनिष्ठ अभियंत्यांना सेवाज्येष्ठतेनुसार उपअभियंतापदी बढती देण्यात आली. उपअभियंत्यांची रिक्त पदे पदोन्नतीने भरण्यासाठी 13 जून 2022 रोजी पदोन्नती समितीची बैठक झाली. कनिष्ठ अभियंत्यांची शैक्षणिक अर्हता, अनुभव कालावधी, सेवाज्येष्ठता, गोपनीय अहवाल, शिस्तभंग आणि मत्ता व दायित्वाची माहिती, संगणक अर्हता इत्यादी सेवाज्येष्ठता पडताळली. त्यानुसार पदोन्नती समितीच्या शिफारसीनुसार 17 कनिष्ठ अभियंत्यांना उपअभियंतापदी बढती देण्यात आली. महापालिकेत कनिष्ठ अभियंत्यांची कमतरता आहे. त्यामुळे बढती मिळालेल्या अभियंत्यांनी कनिष्ठ अभियंता स्थापत्या या पदासह उपअभियंता स्थापत्या या पदोन्नतीच्या पदाचे कामकाज सध्या आस्थापना असलेल्या विभागात पुढील आदेशापर्यंत करायचे आहे. पदोन्नतीमुळे सविस्तर पदस्थापना अलाहिदा देण्यात येईल, असे अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे यांनी आदेशात म्हटले आहे.