नागरिकांनी सुरक्षा ठेवीचे बिल भरून सहकार्य करावे - महावितरण

A PHP Error was encountered

Severity: Notice

Message: Undefined property: stdClass::$link

Filename: post/_post_share_box.php

Line Number: 27

Backtrace:

File: /home/prabo1/public_html/application/views/post/_post_share_box.php
Line: 27
Function: _error_handler

File: /home/prabo1/public_html/application/views/post/post.php
Line: 78
Function: view

File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 294
Function: view

File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 119
Function: post

File: /home/prabo1/public_html/index.php
Line: 326
Function: require_once

नागरिकांनी सुरक्षा ठेवीचे बिल भरून सहकार्य करावे - महावितरण

पिंपरी-चिंचवड, दि. २१ एप्रिल - महावितरणच्या वीजग्राहकांना अतिरिक्त सुरक्षा ठेवीचे स्वतंत्र बिल देण्यात आले आहे. ते पाहून महावितरण वीज ग्राहकांना चांगलाच शॉक बसला आहे.  त्या वरून सध्या शहरात चांगलीच चर्चा सुरू आहे. प्रत्येक वीज ग्राहकाचे सुरक्षा ठेव बिल वेगवेगळ्या रकमेत आहे. कोणला २० रुपये तर कोणाला २ हजार रुपये. त्यामुळे वीज ग्राहकांमध्ये संभ्रम पसरला आहे. त्या विषयी महावितरणशी संपर्क साधला असता त्यांनी याचा खुलासा केला आहे.

महाराष्ट्र विद्युत नियामक आयोगाच्या आदेशाप्रमाणे हे बिल नियमानुसार असून, जमा असलेल्या सुरक्षा ठेवीवर वीजग्राहकांना दरवर्षी मिळणारी व्याजाची रक्कम वीजबिलामध्ये समायोजित केली जाते, असे स्पष्टीकरण महावितरणकडून देण्यात आले आहे.

सध्या 1 एप्रिल 2022 पासून लागू असलेल्या वीजदरानुसार महावितरणकडून वीजबिलांची आकारणी करण्यात येत आहे. यातील बहुतांश वर्गवारीतील वीजदर मागील वर्षीच्या दराच्या पातळीवर ठेवण्यात आल्याने वीजग्राहकांना आर्थिक दिलासा मिळाला आहे. यासोबतच सद्यस्थितीत वीज ग्राहकांना नियमित वीजबिलांसह अतिरिक्त सुरक्षा ठेवीचे स्वतंत्र बिल देण्यात येत आहे. सुरक्षा ठेवीचे बिल हे  नियमानुसारच आहे.

विद्युत नियामक आयोगाने विद्युत पुरवठा संहिता, वितरण परवानाधारकांच्या कृतीचे मानके व पॉवर क्वॉलिटी विनिमय 2021 च्या मसुद्यावर हितसंबंधितांकडून तसेच परवानाधारकांकडून सूचना, हरकती,अभिप्राय मागविले होते व ते विचारात घेऊन 25 फेब्रुवारी 2021 रोजी सदर विनिमय जारी केले आहे. त्यातील विनिमय क्र.13 नुसार ग्राहकांची सुरक्षा ठेव सरासरी देयकाच्या दुप्पट तसेच त्रैमासिक बिलिंग असलेल्या ग्राहकांची सुरक्षा ठेव दीडपट करण्याची करण्याची तरतूद विद्युत नियामक आयोगाकडून करण्यात आली आहे.

या तरतूदीनुसार महावितरणकडून वीजग्राहकांना संबंधित आवश्यक सुरक्षा ठेवीमधील रकमेच्या फरकाची स्वतंत्र बिल देण्यात येत आहे. तसेच जमा असलेल्या सुरक्षा ठेवीवर दरवर्षी स्वतंत्र परिपत्रक काढून व्याज देण्यात येत असते. त्यामुळे सुरक्षा ठेवीची बिल भरून सहकार्य करावे असे आवाहन महावितरणकडून करण्यात आले आहे.