१ मे रोजी उद्धव ठाकरेंची पुण्यात तोफ धडाडणार

A PHP Error was encountered

Severity: Notice

Message: Undefined property: stdClass::$link

Filename: post/_post_share_box.php

Line Number: 27

Backtrace:

File: /home/prabo1/public_html/application/views/post/_post_share_box.php
Line: 27
Function: _error_handler

File: /home/prabo1/public_html/application/views/post/post.php
Line: 78
Function: view

File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 294
Function: view

File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 119
Function: post

File: /home/prabo1/public_html/index.php
Line: 326
Function: require_once

१ मे रोजी उद्धव ठाकरेंची पुण्यात तोफ धडाडणार

पुणे, दि. २८ एप्रिल - येत्या दोन-तीन दिवसांत महाराष्ट्रात पुन्हा एकदा राजकीय पारा वाढणार आहे. 1 मे रोजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची पुण्यात जाहीर सभा होणार आहे. दोन दिवसांपूर्वी उद्धव ठाकरे यांनी एका कार्यक्रमात बोलताना विरोधकांचा समाचार घेणार असल्याचं म्हटलं होतं. विशेष म्हणजे याच दिवशी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची औरंगाबादेत सभा होणार आहे.

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मशिदीतील लाऊडस्पीकरविरोधात आक्रमक भूमिका घेत लाऊडस्पीकर हटवण्यासाठी ३ मे पर्यंतचा अल्टिमेटम दिला आहे. यासाठी त्यांनी राज्य सरकारवरही टीका केली आहे. त्याचवेळी या मुद्द्यावरून उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करत भाजपने त्यांच्या हिंदुत्वाच्या मुद्द्यावरच प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. या सगळ्या टीकेला उद्धव ठाकरे काय उत्तर देणार? या साऱ्या टीकेवर उद्धव ठाकरेंची तोफ आणि विरोधक एक मे रोजी पुण्यात होणाऱ्या सभेत गर्जना करणार आहेत.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी NCMC कार्डचे अनावरण केले. या कार्यक्रमात मुख्यमंत्री बोलत होते. तुतुरी वाजवणाऱ्यांना काडीचीही किंमत देऊ नका, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सुनावले. विरोधकांचा समाचार घेण्यासाठी लवकरच जाहीर सभा घेणार असल्याचेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले होते. यावेळी उद्धव ठाकरे यांनी हिंदुत्व म्हणजे धोतर नाही, असे म्हणत विरोधकांवर हल्लाबोल केला होता. मला हिंदुत्वाची घंटा वाजवायची नाही. लवकरच माझी बैठक होईल आणि मी मुखवटे घातलेले चेहरे उघड करेन. हिंदुत्वाचे मुखवटे घातलेल्यांचा बुरखा फाडणार असल्याचेही ते म्हणाले. विरोधकांच्या मनात बेचैनी व पोटात जळजळ होत आहे.

दरम्यान, महाविकास आघाडीने 30 एप्रिल रोजी सायंकाळी पुण्यात निर्धार सभेचे आयोजन केले आहे. पुण्यातील अलका चौकात सायंकाळी निर्धार सभा होणार आहे. या बैठकीला राष्ट्रवादीचे जितेंद्र आव्हाड आणि धनंजय मुंडे उपस्थित राहणार आहेत. काँग्रेसच्या मंत्री यशोमती ठाकूर उपस्थित राहणार आहेत, तर शिवसेना राज्य मंत्रिमंडळातून एक मंत्री पाठवणार आहे. राज्यातील राजकीय स्थितीत सामाजिक सलोखा राखण्यासाठी या निर्धार सभेचे आयोजन करण्यात आले आहे.