संचेती रुग्णालय पुणे आणि शिवाजीनगर पोलीस स्थानक पुणे संयुक्त विद्यमाने मोफत ऑर्थोपेडिक तपासणी शिबिर

A PHP Error was encountered

Severity: Notice

Message: Undefined property: stdClass::$link

Filename: post/_post_share_box.php

Line Number: 27

Backtrace:

File: /home/prabo1/public_html/application/views/post/_post_share_box.php
Line: 27
Function: _error_handler

File: /home/prabo1/public_html/application/views/post/post.php
Line: 78
Function: view

File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 294
Function: view

File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 119
Function: post

File: /home/prabo1/public_html/index.php
Line: 326
Function: require_once

संचेती रुग्णालय पुणे आणि शिवाजीनगर पोलीस स्थानक पुणे  संयुक्त विद्यमाने मोफत ऑर्थोपेडिक तपासणी शिबिर

पुणे , (प्रबोधन न्यूज )  - सध्याच्या धावपळीच्या जीवनात मानवाला  हाडांचे आजार हा सर्वच कुटुंबात जिव्हाळ्याचा विषय बनला आहे. विशेषतः ज्येष्ठ व्यक्तींना हाडांच्या अनेक समस्या उद्भवतात. वय वाढताना या समस्या वाढू नयेत, यासाठी लवकर काळजी घेतली, तर हे आजार टाळता येणे शक्य आहे. विशेषतः मनके व गुडघ्यांच्या समस्या असतात. हाडांच्या आजारांबाबत पुण्यातील संचेती हाॅस्पिटल केवळ राज्यातच नव्हे, तर जागतिक पातळीवर प्रसिद्ध आहे. 

संचेती रुग्णालय पुणे आणि शिवाजीनगर पोलीस स्थानक पुणे संयुक्तपणे (शनिवार 17 जून)  मोफत ऑर्थोपेडिक तपासणी शिविर आयोजित केले होते.

या मोफत ऑर्थोपेडिक शिबिरात बोन मिनरल डेन्सिटी (BMD) मोफत तपासणी. हड्यांच्या कॅल्शियम स्तर तपासणी
ईसीजी (ECG) तपासणी, रक्तदाब तपासणी, संचेती रुग्णालयाच्या ऑर्थोपेडिक डॉक्टरांनी आणि संचेती रुग्णालय फिजिओथेरपीपी निदेशकांच्या सल्ल्याशी संवाद करण्याची सुविधा उपलब्ध केले होती.

  संचेती रुग्णालयातील ह्या मोफत ऑर्थोपेडिक शिविरामार्फत 200पेक्षा अधिक पोलिस अधिकार्यांना लाभ मिळाले आहे. पुणे शहरातील विविध पोलीस स्टेशनच्या कर्मचाऱ्यांनी या शिबिराचा लाभ घेतला आहे .

मोफत ऑर्थोपेडिक शिविराचे उद्घाटन डॉ. पराग सांचेती ( चैरमन, संचेती रुग्णालय पुणे ) , सहाय्यक पोलीस आयुक्त वसंत कौर आणि वरिष्ठ पीआय अरविंद माने आणि माजी सहायक पोलीस निरीक्षक उत्तम माने यांच्याद्वारे केले गेले.

 वैद्यकीय क्षेत्रात कार्यरत असताना प्रत्येकाने सेवाभाव ठेवला पाहिजे. रुग्ण सेवा हीच ईश्वर सेवा हे ब्रीद वाक्य ठेवून आम्ही कार्यरत आहोत, यापुढेही कार्यरत राहा, असे प्रतिपादन संचेती हॉस्पिटलचे चेअरमन डॉक्टर पराग संचेती यांनी केले

पाठीच्या दुखण्यावर बराच काळ उपचार न केल्यास स्पाइनल स्टेनोसिस सारख्या परिस्थिती विकसित होतात. वारंवार पाठदुखीसाठी इतर अनेक घटक जबाबदार आहेत. असे प्रतिपादन संचेती हॉस्पिटलचे प्रसिद्ध मनका विकार तज्ञ डॉ. जय सकोरे यांनी केले

उत्कृष्ट सेवा आणि शैक्षणिक सोई  हे संचेती हॉस्पिटल चे वैशिष्ट्य आहे मानवी स्पर्शासह अद्ययावत शोध हा डॉ. पराग संचेती यांचा एक अद्वितीय गुण आहे.डॉ पराग डॉक्टर व  डॉ के एच संचेती  ने सुरू केलेले महान मानवतावादी कार्य सुरू ठेवत आहेत असे प्रतिपादन सहाय्यक पोलीस आयुक्त वसंत कुवर सरांनी केले.

पोलीस निरीक्षक अरविंद माने म्हणाले की हाडांचे आजार आपल्या भारतीय जीवनशैलीमध्ये आणि कोविड-19 नंतर खूपच वाढले आहेत अशातच डॉक्टर पराग संचेती आणि त्यांच्या टीमने पोलीस कर्मचाऱ्यांसाठी मोफत शिबिराचे आयोजन करून आमच्या कर्मचाऱ्यांना या संधीचा लाभ मिळवून दिला.  

शिवाजीनगर पोलीस स्टेशन आपल्या कर्मचाऱ्यांसाठी नेहमीच असे उपक्रम घेत असते त्यातीलच एक आज संचेती हॉस्पिटल चे चेअरमन डॉक्टर पराग संचेती व त्यांची पूर्ण टीम आपल्याला या ठिकाणी  मोफत अस्थिविकार तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले असे उपक्रम घेण्यास शिवाजीनगर पोलीस स्टेशन महाराष्ट्र पोलीस नेहमी कटिबद्ध राहील धन्यवाद असे प्रतिपादन  माजी सहायक पोलीस निरीक्षक उत्तम माने सरांनी केले . बाजीराव नाईक सहाय्यक पोलीस निरीक्षक यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.

 राहुल चौबे महाव्यवस्थापक संचेती हॉस्पिटल व  अजिनाथ रोठे श्री रोहित जठार , विजय कासार आणि संचेती हॉस्पिटलच्या सर्व टीमने शिबिरासाठी खूप मदत केली.

या शिबिरामध्ये मोफत हाडांची ढिसूळता तपासणी श्री मंजुनाथ कुलकर्णी यांच्या सहयोगाने करण्यात आली व  शशिकांत फंड यांच्यावतीने मोफत अत्याधुनिक पद्धतीने इसीजी सेवा पोलीस कर्मचाऱ्यांसाठी उपलब्ध करून देण्यात  आली.