'कुणीच कुणाची जिरवायला जात नसतं', शिवेंद्रराजेंचा उदयनराजेंवर पलटवार
A PHP Error was encountered
Severity: Notice
Message: Undefined property: stdClass::$link
Filename: post/_post_share_box.php
Line Number: 27
Backtrace:
File: /home/prabo1/public_html/application/views/post/_post_share_box.php
Line: 27
Function: _error_handler
File: /home/prabo1/public_html/application/views/post/post.php
Line: 78
Function: view
File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 294
Function: view
File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 119
Function: post
File: /home/prabo1/public_html/index.php
Line: 326
Function: require_once
सातारा - सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेने जरंडेश्वर साखर कारखान्याला दिलेल्या कर्जवाटप प्रकरणी बँकेला ईडीने नोटीस बजावली आहे. या प्रकरणावरून आता भाजपचे खासदार उदयनराजे भोसले आणि आमदार शिवेंद्रराजे भोसले यांच्यात कलगीतुरा रंगला आहे. 'कुणीही कुणाची जिरवायला कुठे जात नाही. त्यांची कोण जिरवणार त्यांना सल्लागारांनी सांगितलं असावं' असा टोला शिवेंद्रराजे यांनी उदयनराजेंना लगावला.
सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेला ईडीची नोटीस आल्यामुळे खळबळ उडाली आहे. या नोटीस संदर्भात खासदार उदयनराजे भोसले यांनी बँकेकडे माहिती मागत विचारणा केली. मात्र, बँकेच्या संचालकांनी ही माहिती देण्यास नकार दिला. त्यामुळे उदयनराजे चांगलेच संतापले. उदयनराजे भोसले यांनी जिल्हा बँकेवरून "माझी जिरवा पण सभासदांची जिरवू नका" अशी हात जोडून संतप्त प्रतिक्रिया दिली होती.