पीसीसीओईआर मध्ये टेक्नोवेट-२०२२ उत्साहात साजरा.....

पीसीसीओईआर मध्ये टेक्नोवेट-२०२२ उत्साहात साजरा.....

पिंपरी (दि. २८ एप्रिल) - अद्ययावत तंत्रज्ञानावर आधारित टेक्नोवेट सारख्या स्पर्धांमधून अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढेल यातूनच सक्षम अभियंते घडतील असे प्रतिपादन गेल कंपनीचे व्यवस्थापक डॉ. शिवराज भोर यांनी केले.
पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्टच्या (पीसीईटी) रावेत येथील पिंपरी चिंचवड अभियांत्रिकी आणि संशोधन महाविद्यालय (पीसीसीओईआर) येथे टेक्नोवेट-२०२२ या राज्यस्तरीय स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाचे सहआयुक्त डॉ. प्रशांत अमृतकर व गेलचे व्यवस्थापक डॉ. शिवराज भोर म्हणून उपस्थित होते.
याप्रसंगी बोलताना पीसीसीओईआरचे प्राचार्य डॉ. हरीश तिवारी यांनी टेक्नोवेट - २०२२ स्पर्धेमागील संकल्पना व उद्देश स्पष्ट केले. डॉ. प्रशांत अमृतकर यांनी आपल्या आयुष्यातील खडतर प्रसंगांचा दाखला देत विद्यार्थ्यांना स्पर्धा आणि संकटांकडे सकारात्मक दृष्टिकोनातून पाहण्याविषयी मार्गदर्शन केले.
डॉ. शिवराज भोर यांनी आपल्या भाषणात नव संकल्पनाविषयी भाष्य करून अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांना तंत्रज्ञानाविषयी जागरूक व अद्ययावत रहाण्याचा सल्ला दिला. टेक्नोवेट-२०२२ मध्ये तंत्रज्ञानावर आधारित रोबोरेस, ड्रोन, मशीन डिजाईन, अल्गोरिथम डिजाईन इत्यादी अकरा स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते यामधे विविध महाविद्यालयांतील ३०० पेक्षा अधिक स्पर्धकांनी आपला सहभाग घेतला होता. याचा बक्षीस समारंभ प्रसंगी मॅग्नाप्लास्ट टेक्नॉलॉजिच्या व्यवस्थापकीय संचालिका राजश्री गागरे, बालाजी वॉल्व कॉम्पोनंट्सचे संचालक श्रीनिवास कोले यांनी टेक्नोवेट-२०२२ च्या आयोजनाबद्दल समाधान व्यक्त करून विजेत्या स्पर्धकांचे कौतुक केले.
टेक्नोवेट-२०२२ हा कार्यक्रम पीसीईटीचे अध्यक्ष  ज्ञानेश्वर लांडगे, उपाध्यक्षा श्रीमती पदमाताई भोसले, सचिव  विठ्ठल काळभोर, खजिनदार  शांताराम गराडे व व्यवस्थापकीय संचालक डॉ. गिरीश देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आला होता.
स्पर्धेच्या समन्वयक प्रा. त्रिवेणी ढमाले यांनी आभार मानले.