आदित्य ठाकरे, प्रज्ञा सातव यांच्या हल्ल्यामागील मुख्य सूत्रधार शोधा – अजित पवार
A PHP Error was encountered
Severity: Notice
Message: Undefined property: stdClass::$link
Filename: post/_post_share_box.php
Line Number: 27
Backtrace:
File: /home/prabo1/public_html/application/views/post/_post_share_box.php
Line: 27
Function: _error_handler
File: /home/prabo1/public_html/application/views/post/post.php
Line: 78
Function: view
File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 294
Function: view
File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 119
Function: post
File: /home/prabo1/public_html/index.php
Line: 326
Function: require_once
पुणे (प्रबोधन न्यूज) - काँग्रेस आमदार प्रज्ञा सातव तसेच ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांच्या हल्ल्यामागे मुख्य सुत्रधार कोण आहे, हे शोधून काढा, अशी मागणी विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी राज्य सरकारकडे केली आहे. हल्ल्यांमागील मास्टरमाईंडला कठोरातील कठोर शासन करावे. जेणेकरुन यापुढे असे हल्ले होणार नाहीत, असे अजित पवार म्हणाले.
आज पुण्यात पत्रकारांशी संवाद साधताना अजित पवार म्हणाले, खासदार राजीव सातव हे तरुण नेतृत्व होते आणि काँग्रेस नेते राहुल गांधी यांचे जवळचे सहकारी होते. त्यांचे अकाली निधन झाल्यानंतर त्यांच्या पत्नी प्रज्ञा सातव राजकारणात आल्या. त्यांच्या सोबत काम करण्याची संधी मिळाली आहे. अचानक त्यांच्यावर झालेला हल्ला निषेधार्ह आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तातडीने याप्रकरणात लक्ष घातले पाहीजे. आरोपीला कठोरातील कठोर शासन व्हायला हवे. अशाप्रकारचे हल्ले कोणावरही झाले नाही पाहिजे.
अजित पवार म्हणाले, महिलांना आपण मान- सन्मान देतो. प्रज्ञा सातव या राजीव सातव यांचा वारसा पुढे नेत आहे. दोन दिवसांपूर्वी शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांच्यावरही हल्ला झाला. प्रत्येक नागरिकाचे रक्षण करणे हे सरकारचे कर्तव्य आहे. या हल्ल्यांमागे कोण मुख्य सूत्रधार आहे त्याचा शोध घेऊन त्याच्यावर कारवाई करण्यात आली पाहिजे. सत्ता कोणाचीही असली तरी विरोधकांना ही पुरेसे सरंक्षण मिळाले पाहिजे.