पुणे पोलिसांच्या श्वान पथकातील श्वानांचे अनोखे नामकरण, अशी ठेवली नावे

A PHP Error was encountered

Severity: Notice

Message: Undefined property: stdClass::$link

Filename: post/_post_share_box.php

Line Number: 27

Backtrace:

File: /home/prabo1/public_html/application/views/post/_post_share_box.php
Line: 27
Function: _error_handler

File: /home/prabo1/public_html/application/views/post/post.php
Line: 78
Function: view

File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 294
Function: view

File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 119
Function: post

File: /home/prabo1/public_html/index.php
Line: 326
Function: require_once

पुणे पोलिसांच्या श्वान पथकातील श्वानांचे अनोखे नामकरण, अशी ठेवली नावे

पुणे, दि. 25 मार्च - पुणे शहर पोलिसांनी आपल्या श्वान पथकात वाघ्या, शौर्य, ऑस्कर आणि रक्षक अशी नावे असणाऱ्या सदस्यांच्या आगमनाची घोषणा केली आहे. विशेष म्हणजे ही नावे नागरिकांनी सुचवलेल्या शेकडो नावांमधून निवडण्यात आली होती.

पथकातील इतर सदस्यांसह आणि चार नवीन श्वानांसह फोटो ट्विट करत पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता म्हणाले, 'वाघ्या, शौर्य, ऑस्कर आणि रक्षक यांना 'वूफ' (woof ) म्हणतात. शेकडो नावांमधून निवडलेली चार नावे आमच्या नवीन K9 श्वानांसाठी दिली आहेत. निवडलेल्या प्रत्येक नावाला वेगळा असा अर्थ आहे असे गुप्ता यांनी सांगितले. चला तर, जाणून घेऊया ही चार नावे आणि त्यांचा अर्थ. 

१ वाघ्या- म्हणजे वाघ किंवा वाघासारखे गुणधर्म असलेले.  हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या निष्ठावंत पाळीव कुत्र्याचे नाव होते. वाघ्या नावाचा नवीन भर्ती झालेला श्वान हा डॉबरमॅन असून त्याला गुन्हे शोधण्याचे प्रशिक्षण दिले जाईल.

२ शौर्य- म्हणजे शौर्य, एक लॅब्राडोर आहे ज्याला बॉम्ब शोधण्याचे प्रशिक्षण मिळेल.  

३ ऑस्कर - ओ अक्षराच्या रेडिओटेलीफोनी प्रतिनिधित्वावरून नाव देण्यात आलेला ऑस्कर हा एक लॅब्राडोर आहे ज्याला बॉम्ब शोधण्याचे प्रशिक्षण दिले जाईल. 

४ रक्षक - रक्षक म्हणजे संस्कृतमध्ये संरक्षण करणारा. हा एक लॅब्राडोर आहे ज्याला अंमली पदार्थ शोधण्याचे प्रशिक्षण दिले जाईल.

खरेतर श्वानपथक संरक्षणाच्या दृष्टीने महत्त्वाची भूमिका बजावतात. जसे की चोरी, बॉम्बस्फोट, कार्यक्रमांसाठी व्हीआयपींचे आगमन, नक्षलविरोधी कारवाया आणि आरडीएक्स स्निफिंग यांसारख्या घटनांना तोंड देण्यासाठी हे प्रशिक्षित श्वान चांगले काम करतात. एक श्वान K9 युनिटचा प्रमाणित सदस्य होण्यापूर्वी 10 ते 14 आठवडे प्रशिक्षण घेतो. लोक सहसा हे विसरतात की K9 हा पोलिस दलाचा सदस्य असतो, त्यांच्याकडे नेहमीच्या पोलिस कार्यालयाप्रमाणेच बॅलिस्टिक बनियान आणि बॅज असतो. त्यामुळे K9 अधिकाऱ्यावर म्हणजेच प्रशिक्षित श्वानावर प्राणघातक हल्ला करणे हा फौजदारी गुन्हा आहे, जो इतर कोणत्याही पोलीस अधिकाऱ्यावर हल्ला करण्यासारखाच आहे !

महाराष्ट्रातील पोलीस तुकड्या सामान्यत: डॉबरमन, जर्मन शेफर्ड, लॅब्राडोर रिट्रीव्हर्स यासारख्या साहसी जातीच्या श्वानांची भरती करतात. गेल्या तीन वर्षांत त्यांनी 'बेल्जियन मालिनॉईस' या जातीच्या श्वानांनाही समाविष्ट करण्यास सुरुवात केली आहे. पुणे शहरातील पोलिसांजवळ आता श्वानांची संख्या नऊ आहे, ज्यामधील चार श्वान १० वर्ष सेवा पूर्ण करून निवृत्त झाले आहेत. 

पुण्यातील श्वान पथक नेहमीच चर्चेत राहिले आहे. कारण जॅक या पाच वर्षांच्या डॉबरमॅन श्वानाने चाकण हत्याकांडात त्याचा हँडलर पी.एन. बोयने यांच्यासह खुन्याचे ठिकाण शोधण्यात मदत केली होती. पुणे पोलिसांच्या K9 पथकाचा एक सदस्य, कॅनाइन युनिटचा जॅक हा पोलिसांच्या खटल्यांमध्ये मदत करणाऱ्या नऊ पूर्ण-प्रशिक्षित सदस्यांपैकी एक आहे.

अशाप्रकारे 1962 मध्ये स्थापन झालेल्या, पुण्यातील महाराष्ट्र स्टेट डॉग ट्रेनिंग स्कूल श्वानांना प्रामुख्याने चार कामांसाठी प्रशिक्षित करते. यात गुन्ह्याच्या शोधामध्ये ते गंध निवडणे, ओळखणे आणि तपास करणे, अंमली पदार्थ शोधणे, गस्त घालणे किंवा पहारेकरी करणे आणि बॉम्ब शोध आणि निकामी करणाऱ्या पथकासाठी स्फोटके शोधणे, अशी महत्वाची कामे पार पाडली जातात. सध्या तरी महाराष्ट्रात 450 हून अधिक श्वान या सेवेत आहेत.