पंतप्रधान मोदी व त्यांचा पक्ष म्हणजे एक अजब रसायन – सामना
A PHP Error was encountered
Severity: Notice
Message: Undefined property: stdClass::$link
Filename: post/_post_share_box.php
Line Number: 27
Backtrace:
File: /home/prabo1/public_html/application/views/post/_post_share_box.php
Line: 27
Function: _error_handler
File: /home/prabo1/public_html/application/views/post/post.php
Line: 78
Function: view
File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 294
Function: view
File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 119
Function: post
File: /home/prabo1/public_html/index.php
Line: 326
Function: require_once
मुंबई, दि. २९ एप्रिल - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल घेतलेल्या बैठकीत ठाकरे सरकारवर टीका करत राज्य सरकारने व्हॅट कमी न केल्यानेच महाराष्ट्रातील जनतेला त्रास सहन करावा लागत असल्याचा आरोप केला. मोदींच्या आरोपांना शिवसेनेने सामनाच्या अग्रलेखातून प्रत्युत्तर दिले. पंतप्रधान मोदी व त्यांचा पक्ष म्हणजे एक अजब रसायन आहे, अशा शब्दात शिवसेनेने मोदींवर हल्लाबोल केला.
काँगेस राजवटीत पेट्रोल ७० रुपये लिटर झाले तेव्हा भाजप थयथयाट करीत महागाईविरोधात रस्त्यावर उतरला होता. गुजरातचे मुख्यमंत्री असलेले मोदी तेव्हा ”पंतप्रधान महागाईवर बोलत का नाहीत? ते गप्प का आहेत?” अशा प्रश्नांचा भडीमार करीत होते. आता मोदी मंत्रिमंडळातील सदस्य महागाईचे समर्थन करतात व मोदी हे काय पेट्रोल, डिझेलचे भाव कमी करण्यासाठी पंतप्रधान झालेत काय? असे उलट प्रश्न करतात. पेट्रोल-डिझेलची भाववाढ हे जागतिक संकट आहे, असे पंतप्रधानांचे सांगणे आहे. रशिया-युक्रेन युद्धाचा हा परिणाम आहे हे मान्य. पण मनमोहन सिंग पंतप्रधान असतानाही पेट्रोल-डिझेलचे आजच्या प्रमाणेच जागतिक संकट होते, असे शिवसेनेने म्हटले आहे.
शिवसेनेने अग्रलेखात म्हटले की, पंतप्रधान मोदी व त्यांचा पक्ष म्हणजे एक अजब रसायन आहे. देशभरात कोरोना संसर्ग वाढत असल्याने चौथी लाट येईल की काय, या चिंतेने पंतप्रधान मोदी यांनी सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी संवाद साधला, हे कौतुकास्पद आहे. कोरोना प्रतिबंधक लस, ऑक्सिजन पुरवठा, रुग्णालयांची तयारी यांचा आढावा घेतला. हे सगळे ठीक असले तरी या कोरोना बैठकीमागचा मूळ हेतू वेगळाच होता. बिगर भाजपशासित राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना ‘टोमणे’ मारणे, हाच या संवाद बैठकीचा हेतू होता. कारण इंधनाच्या भाववाढीवरून बैठकीत वादाची ठिणगी पडली. पेट्रोल, डिझेलचे भाव शंभरी पार आहेत.