महाराष्ट्र

अधिवेशनात अजित पवारांनी सत्ताधाऱ्यांना कोंडीत पकडले

अजित पवार यांनी शेतकऱ्यांच्या शेतमालाचे प्रश्न, राज्यातील सत्तासंघर्ष, पक्षांतर बंदी कायदा आदी मुद्यांवर विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी सरकारला चांगलेच धारेवर धरले.

आम्हाला न्याय मिळाला नाही तर रक्तपात होईल – शरद कोळी (ठाकरे गट)

सर्वोच्च न्यायालयात आमच्या बाजूने निर्णय लागला नाही तर रस्त्यावर रक्तपात होईल, असा इशाराच कोळी यांनी दिला आहे.

दिल्ली लीकर घोटाळ्याचं कनेक्शन महाराष्ट्रापर्यंत?

दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनिष सिसोदिया यांच्याविरोधातील कथित दारू घोटाळ्याचं कनेक्शन तत्कालीन महाविकास आघाडी सरकारपर्यंत आहे का, असा संशय व्यक्त होतोय.

छत्रपती संभाजीनगरमध्ये वुमन-२० प्रारंभिक बैठकीला सुरुवात

छोटे आणि मध्यम उद्योग, हवामान कृती, शिक्षण आणि कौशल्य, लैंगिक डिजिटल तफावत आणि तळागाळातून नेतृत्व साकारणे या संदर्भात महिलांच्या भूमिकेवर चर्चा झाली.

आशियातील सर्वात मोठ्या कांदा मार्केटचे काम ठप्प, शेतकऱ्यांनी केला सरकारचा निषेध

महाराष्ट्रातील नाशिकमधील लासलगाव एपीएमसी येथील कांद्याच्या घाऊक किंमतीमुळे शेतकऱ्यांनी आज लिलाव थांबवले. महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक संघानेही सरकारच्या विरोधात धरणे आंदोलन केले. घाऊक बाजारात कांदा १ ते २ रुपये प्रति किलोना खरेदी केला जात आहे.

आज मराठी भाषा गौरव दिन; विविध कार्यक्रमांचे आयोजन

२७ फेब्रुवारी या दिनाचे औचित्य साधून महाराष्ट्रात, देशभरात आणि जगभरात जिथे मराठी माणसे वास्तव्यास आहेत तेथे मराठी राजभाषा दिन साजरा केला जातो.