गजानन महाराजांचा १४५ वा प्रगट दिन उत्सव, शेगावनगरी सजली (फोटो गॅलरी)

A PHP Error was encountered

Severity: Notice

Message: Undefined property: stdClass::$link

Filename: post/_post_share_box.php

Line Number: 27

Backtrace:

File: /home/prabo1/public_html/application/views/post/_post_share_box.php
Line: 27
Function: _error_handler

File: /home/prabo1/public_html/application/views/post/post.php
Line: 78
Function: view

File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 294
Function: view

File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 119
Function: post

File: /home/prabo1/public_html/index.php
Line: 326
Function: require_once

गजानन महाराजांचा १४५ वा प्रगट दिन उत्सव, शेगावनगरी सजली (फोटो गॅलरी)
गजानन महाराजांचा १४५ वा प्रगट दिन उत्सव, शेगावनगरी सजली (फोटो गॅलरी)
गजानन महाराजांचा १४५ वा प्रगट दिन उत्सव, शेगावनगरी सजली (फोटो गॅलरी)
गजानन महाराजांचा १४५ वा प्रगट दिन उत्सव, शेगावनगरी सजली (फोटो गॅलरी)
गजानन महाराजांचा १४५ वा प्रगट दिन उत्सव, शेगावनगरी सजली (फोटो गॅलरी)
गजानन महाराजांचा १४५ वा प्रगट दिन उत्सव, शेगावनगरी सजली (फोटो गॅलरी)
गजानन महाराजांचा १४५ वा प्रगट दिन उत्सव, शेगावनगरी सजली (फोटो गॅलरी)

शेगाव (प्रबोधन न्यूज) - श्री संत गजानन महाराज संस्थान च्या वतीने श्री संत गजानन महाराजांचा १४५ वा प्रगट दिन उत्सव दि. ६ फेब्रुवारी ते १३ फेब्रुवारी या कालावधीत परंपरेनुसार भक्तीमय वातावरणात मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येत आहे. या उत्साहात सहभागी होण्यासाठी राज्यातील, इतर राज्यातील ११०० भजनी दिंड्या हजारो महिला,पुरुष वारकरी यांच्या मुखातून गजानन महाराज, ज्ञानोबा तुकाराम नाम घोषाने विदर्भातील पंढरीत भाविकांची मांदियाळी जमली आहे.

दि. १३ फेब्रुवारी रोजी श्रींच्या मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. दिनांक १३ फेब्रुवारी रोजी श्री संत गजानन महाराज प्रकट दिन असल्याने सकाळी दहा ते बारा वाजेपर्यंत ह भ प श्रीराम बुवा ठाकूर परभणी यांचे शेगावी श्रींच्या प्रगट दिनानिमित्त कीर्तन होईल. या उत्सवात महारुद्रस्वाहाकार यागास ६ फेब्रुवारी रोजी होऊन १३ फेब्रुवारी रोजी सकाळी १० वाजता यागाची पूर्णाहूती होईल व दुपारी श्रींची पालखी परिक्रमे करिता निघणार असून यामध्ये अश्व रथ, मेणा, पताकाधारी, टाळकरी, वारकरी भक्त मंडळी सहभागी होणार आहेत. तर दुसऱ्या दिवशी १४ फेब्रुवारी मंगळवार रोजी सकाळी सात ते आठ काल्याचे कीर्तन हभप प्रमोद बुवा राहणे पळशी यांचे होईल व श्रींच्या १४५ व्या प्रगट दिन उत्सवाची सांगता होईल.

श्रींच्या पालखीचे मार्ग:-

श्री ग.म. मंदिर उत्तर द्वारातून बाहेर, महात्मा फुले बँकेसमेरून, क्रांतीसूर्य महात्मा ज्योतीराव फुले चौकतून, श्री संत सावता माळी चौक, श्री हिरहर मंदिर जवळून, भीम नगर (तीन पुतळा परीसर), शाळा क्र. 2, फुले नगरातून, श्री प्रगटस्थळ जवळून, सितामाता मंदिर, श्री लायब्ररी जवळून, पश्चिम गेट मधून श्री मंदिर परिसरामध्ये परत.

श्रींच्या प्रगट दिन महोत्सवासाठी येणाऱ्या सर्व भक्तांच्या सोयीसाठी श्री मंदिर परिसरात भाविकांची गर्दी होईल हे लक्षात घेता वन-वे एकेरी मार्ग करण्यात आला आहे. त्यामध्ये श्रींचे समाधी दर्शन व्यवस्था, श्री मुख दर्शन व्यवस्था, श्री महाप्रसाद, श्री पारायण कक्ष मंडप इत्यादी व्यवस्था संस्थांच्या वतीने करण्यात आली आहे.

श्रींच्या समाधी मंदिरावर रंगबेरंगी आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. त्याचबरोबर मंदिर परिसरात केळीचे खांब आंबाच्या पानाचे तोरणे लावण्यात आले आहेत.

भजनी दिंड्यांचे संतनगरी आगमन

जय गजानन श्री गजानन, मुखी हरिनाम घ्यावे पुढे पाऊल टाकावे, वारकरी भक्त मंडळी नामजप करीत गण गण गणात बोते, मंत्राचा नाम जप, जय हरी विठ्ठल श्री हरी विठ्ठल असा श्री नामाचा गजर टाळ मृदंगाचा गजर करी त ११०० च्या वर भरनी दिंड्या संतनगरीत दाखल झाले आहेत व भजनी दिंड्या श्रींच्या मंदिरात येताच श्रींच्या समाधीचे व कळसाचे दर्शन करून नित्य मार्गाने जात आहेत. आज संध्याकाळपर्यंत ११०० च्या वर भजनी दिंड्या संतनगरीत दाखल झाले आहेत व अजून भजनी दिंड्यांचा ओघ संतनगरीत चालू आहे. दिंडीत सहभागी वारकऱ्यांसाठी संस्थांनच्या वतीने वैद्यकीय सेवा, महाप्रसाद व्यवस्था चालू आहे.

श्रींच्या प्रकट दिन उत्सवात सहभागी दिंड्यांना नियमांची पूर्तता केल्यावर १० टाळ, वीणा, मृदुंग, हातोडी, ६ पताका, ज्ञानेश्वरी, एकनाथी भागवत, तुकाराम गाथा देण्यात येत आहे.