आज मराठी भाषा गौरव दिन; विविध कार्यक्रमांचे आयोजन
२७ फेब्रुवारी या दिनाचे औचित्य साधून महाराष्ट्रात, देशभरात आणि जगभरात जिथे मराठी माणसे वास्तव्यास आहेत तेथे मराठी राजभाषा दिन साजरा केला जातो.
A PHP Error was encountered
Severity: Notice
Message: Undefined property: stdClass::$link
Filename: post/_post_share_box.php
Line Number: 27
Backtrace:
File: /home/prabo1/public_html/application/views/post/_post_share_box.php
Line: 27
Function: _error_handler
File: /home/prabo1/public_html/application/views/post/post.php
Line: 78
Function: view
File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 294
Function: view
File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 119
Function: post
File: /home/prabo1/public_html/index.php
Line: 326
Function: require_once
पिंपरी – २७ फेब्रुवारी हा दिवस ‘जागतिक मराठी भाषा दिवस’, मराठी भाषा दिन, ‘मराठी भाषा गौरव दिन’ अशा अनेक नावाने साजरा केला जातो. मराठी भाषेतील ज्येष्ठ साहित्यिक आणि ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेले विष्णू वामन शिरवाडकर उर्फ कुसुमाग्रज यांच्या जन्मदिनी ‘मराठी भाषा दिन’ साजरा करण्याची सुरुवात करण्यात आली. कुसुमाग्रज यांचे मराठी साहित्यातील योगदान खूप मोठे आहे. आपण आणि भविष्यातील पिढीने मराठीचा वारसा पुढे चालवावा म्हणूनच ‘मराठी राजभाषा दिन’ साजरा करण्यात येतो.
मराठी भाषा बोलणाऱ्या जगातील प्रत्येक कानाकोपऱ्यात या दिनानिमित्त मराठी मंडळाकडून विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. मराठी भाषेची गौरवशाली परंपरा जपण्यासाठी व तिचे संवर्धन करण्यासाठी मराठी भाषा गौरव दिनाचे औचित्य साधून विविध ठिकाणी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
मराठी भाषेची गौरवशाली परंपरा जपण्यासाठी व तिचे संवर्धन करण्यासाठी मराठी भाषा गौरव दिनाचे औचित्य साधून विधानमंडळातील मराठी भाषा समितीतर्फे ज्ञानपीठ पुरस्कार विजेत्या मराठी लेखकांच्या साहित्यावर आधारित “मराठी साहित्याची ज्ञानयात्रा” या कार्यक्रमाचे आयोजन आज दुपारी 3.00 ते 5.00 यावेळेत मध्यवर्ती सभागृह, विधानभवन, मुंबई येथे करण्यात आले आहे. वि.स.खांडेकर, कुसुमाग्रज, विंदा करंदीकर आणि भालचंद्र नेमाडे या ज्ञानपीठ पुरस्कार विजेत्या मराठी लेखकांच्या साहित्यकृतींचे अभिवाचनाद्वारे संस्मरण यावेळी करण्यात येईल. हा कार्यक्रम मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, विधानसभेचे अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर, उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे, विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ, मराठी भाषा मंत्री दिपक केसरकर, संसदीय कार्य मंत्री चंद्रकांत (दादा) पाटील, विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार आणि विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्या प्रमुख उपस्थितीत आयोजित करण्यात आला आहे.
ठाकरे गटाकडून जागर मराठी भाषेच्या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे. स्थानीय लोकाधिकारी समिती महासंघाच्यावतीने हा कार्यक्रम पार पडणार असून उद्धव ठाकरे आणि आदित्य या कार्यक्रमाला हजर राहणार आहेत.
मराठी राजभाषा दिनानिमित्त महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची नवी मुंबईत प्रकट मुलाखत होणार आहे. पनवेलच्या वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात ही मुलाखत घेण्यात येणार आहे. तसंच, मिरा भाईंदर महानगरपालिकेतर्फे मराठी भाषा दिनानिमित्त भव्य ग्रंथ दिंडी मिरवणूक काढण्यात येणार आहे.
पुणे येथे २७ फेब्रुवारी १९१२ मध्ये जन्मलेल्या वि. वा. शिरवाडकर यांना लहानपणापासून लिहिण्याची आवड होती. त्यांनी बालवयातच कविता लिहण्यास सुरूवात केली. पुढे कथा, कादंबरी, नाटक, ललित वाङ्मयातील नावाजलेली साहित्य रचना त्यांच्या लिखानातून अवतरत राहिली. १९७४ मध्ये ‘नटसम्राट’ या नाटकासाठी ‘साहित्य अकादमीचा पुरस्कार’ त्यांना मिळाला.
तसेच १९८७ साली साहित्यातील सर्वोच्च असा ‘ज्ञानपीठ पुरस्कार’ आणि भारत सरकारने १९९१ मध्ये त्यांना ‘पद्मभूषण’ पुरस्काराने सन्मानीत केले. २७ फेब्रुवारी या दिनाचे औचित्य साधून महाराष्ट्रात, देशभरात आणि जगभरात जिथे मराठी माणसे वास्तव्यास आहेत तेथे मराठी राजभाषा दिन साजरा केला जातो. या निमित्त विविध प्रकारची मराठी नाटके, चित्रपट, शास्त्रीय संगीत, काव्य संमेलन, निबंध, वक्तृत्व स्पर्धा आणि मराठी भाषेचा जागर करण्याचे विविध कार्यक्रम आयोजित केले जातात.