अधिवेशनात अजित पवारांनी सत्ताधाऱ्यांना कोंडीत पकडले

अजित पवार यांनी शेतकऱ्यांच्या शेतमालाचे प्रश्न, राज्यातील सत्तासंघर्ष, पक्षांतर बंदी कायदा आदी मुद्यांवर विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी सरकारला चांगलेच धारेवर धरले.

A PHP Error was encountered

Severity: Notice

Message: Undefined property: stdClass::$link

Filename: post/_post_share_box.php

Line Number: 27

Backtrace:

File: /home/prabo1/public_html/application/views/post/_post_share_box.php
Line: 27
Function: _error_handler

File: /home/prabo1/public_html/application/views/post/post.php
Line: 78
Function: view

File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 294
Function: view

File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 119
Function: post

File: /home/prabo1/public_html/index.php
Line: 326
Function: require_once

अधिवेशनात अजित पवारांनी सत्ताधाऱ्यांना कोंडीत पकडले

मुंबई - राज्यपाल अभिभाषणावरील अभिनंदन प्रस्तावावर बोलताना विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी सरकारला लक्ष्य केले. विविध मुद्द्यांवर बोट ठेवत अजित पवारांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना चिमटे काढले.

यावेळी अजित पवार यांनी शेतकऱ्यांच्या शेतमालाचे प्रश्न, राज्यातील सत्तासंघर्ष, पक्षांतर बंदी कायदा, घटनापीठातील सुनावणी, एसटीची दुरावस्था, अरबी समुद्रातील छत्रपती शिवाजी महाराजांचं शिवस्मारक या मुद्यावर अजित पवार यांनी भाष्य केलं. महाराष्ट्रात जून २०२२ मध्ये राज्यात झालेल्या सत्तासंघर्षाच्या काळातील एक प्रसंग सांगत अजित पवारांनी भाजपला कोंडीत पकडलं.

दरम्यान, अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या तिसऱ्या दिवशीही विरोधकांनी विविध मागण्यांवरून विधानभवनाच्या पायऱ्यांवर आंदोलन करत घोषणाबाजी केली.

संजय राऊतांवर हक्कभंग आणण्याची भाजपची मागणी

खासदार संजय राऊत यांनी कोल्हापुरात शिंदे गटावर टीका करताना ते विधिमंडळ नाही तर ४० जणांचं चोरमंडळ असल्याची टीका केली. या वक्तव्याचे पडसाद आता विधानसभेत उमटले आहेत. त्यांच्याविरोधात सत्ताधारी आक्रमक झाले असून, भाजप आमदार आशिष शेलार यांनी विधानसभेत राऊतांचा समाचार घेतला. संजय राऊत यांच्या विरोधात हक्कभंग अर्ज प्राप्त झाल्याची माहिती विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिली.

मुंबई: अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या तिसऱ्या दिवशी विरोधकांनी विविध मागण्यांवरून विधानभवनाच्या पायऱ्यांवर आंदोलन करत घोषणाबाजी केली. शिवसेना (उबाठा) खासदार संजय राऊत यांनी कोल्हापुरात शिंदे गटावर टीका करताना ते विधिमंडळ नाही तर ४० जणांचं चोरमंडळ असल्याची टीका केली. या वक्तव्याचे पडसाद आता विधानसभेत उमटले आहेत. त्यांच्याविरोधात सत्ताधारी आक्रमक झाले असून, भाजप आमदार आशिष शेलार यांनी विधानसभेत राऊतांचा समाचार घेतला. संजय राऊत यांच्या विरोधात हक्कभंग अर्ज प्राप्त झाल्याची माहिती विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिली.

तसेच विरोधीपक्षनेते अजित पवार यांनीही शेलारांची बाजू घेत विधिमंडळाला चोर म्हणणं चुकीचं असल्याचे सांगितले. तसेच कोणत्याही नेत्याकडून अशी वक्तव्य नकोत असेही पवार म्हणाले. तर दुसरीकडे  काँग्रेसचे जेष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनीही विधानसभेत बोलताना राऊत यांचं वक्तव्य तपासून घ्यावं, असं म्हटलं. शिवसेना (शिंदे गटाचे) आमदार भरत गोगावले यांनी राऊत यांच्यावर कारवाईची मागणी केली आहे.

राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सोमवारपासून सुरुवात झाली आहे. आज अधिवेशनाचा तिसरा दिवस आहे. सत्ताधारी-विरोधकांमध्ये जोरदार संघर्ष पहायला मिळू शकतो. सोमवारपासून दोन्ही बाजूंनी आरोप - प्रत्यारोपांना सुरुवात झाली आहे. राज्यातील कांदा कापूस द्राक्ष आणि हरभरा उत्पादनाची निर्यात होत नसल्याने शेतकरी प्रचंड अडचणीत आहे. सरकारकडून ठोस धोरण आखले जात नाही. पिकाला हमीभाव दिला जात नसल्याने विरोधकांनी विधान परिषदेत काल आवाज उठवला होता.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यावर स्पष्टीकरण दिले. परराज्यातील मार्केट अडचणीत असल्याने कांद्याची निर्यात होत नाही, असे त्यांनी सांगितले होते. देवेंद्र फडणवीस सभागृहाची दिशाभूल करत असल्याचा आरोप करत विरोधकांनीदेखील सभागृह डोक्यावर घेतले होते. गदर झाल्याने सभापती नीलम गोरे यांनी काल दोनवेळा कामकाज तहकूब केले होते.