संसदेतील शिवसेनेच्या कार्यालयावरही शिंदे गटाचा ताबा

A PHP Error was encountered

Severity: Notice

Message: Undefined property: stdClass::$link

Filename: post/_post_share_box.php

Line Number: 27

Backtrace:

File: /home/prabo1/public_html/application/views/post/_post_share_box.php
Line: 27
Function: _error_handler

File: /home/prabo1/public_html/application/views/post/post.php
Line: 78
Function: view

File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 294
Function: view

File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 119
Function: post

File: /home/prabo1/public_html/index.php
Line: 326
Function: require_once

संसदेतील शिवसेनेच्या कार्यालयावरही शिंदे गटाचा ताबा

नवी दिल्ली (प्रबोधन न्यूज) - नुकतेच केंद्रीय निवडणूक आयोगाने शिंदे गटालाच खरी शिवसेना म्हणून मान्यता देण्याचा निर्णय घेतल्यानंतर लोकसभा सचिवालयाने संसद भवनातील शिवसेनेचे कार्यालय एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील गटाला दिले आहे. शिंदे गटाचे नेते राहुल शेवाळे यांनी लिहिलेल्या पत्राला उत्तर देताना लोकसभा सचिवालयाने सांगितले की, संसद भवनातील सेनेच्या कार्यालयासाठी नियुक्त केलेली खोली पक्षाला देण्यात आली आहे.

नुकतेच केंद्रीय निवडणूक आयोगाने गेल्या आठवड्यात शिवसेनेतील शिंदे गटाला मूळ शिवसेना म्हणून मान्यता दिली होती. तसेच त्यांना निवडणुकीत धनुष्य आणि बाण चिन्ह वापरण्याची परवानगी दिली होती आणि स्व. बाळासाहेब ठाकरे यांनी 1966 मध्ये स्थापन केलेल्या पक्षावर उद्धव ठाकरे यांचा दावा नाकारला होता. त्यानंतर 18 फेब्रुवारी रोजी शेवाळे यांनी लोकसभा सचिवालयाला पत्र लिहून पक्षाला कार्यालय वाटप करण्याची मागणी केली होती. आतापर्यंत दोन्ही गट संसद भवनातील शिवसेनेच्या कार्यालयाचा वापर करत होते.

शिवसेनेत मोठी फूट झाल्यानंतर एकनाथ शिंदे समर्थक खासदारांच्या गटाला आणि राहुल शेवाळे यांच्या गटनेतेपदाला लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी मान्यता दिली होती. एकनाथ शिंदे यांच्यासह शिवसेनेतील ४० आमदारांच्या बंडानंतर शिवसेनेच्या १२ खासदारांनी दिल्लीत पत्रकार परिषद घेऊन शिंदे गटात सामील झाल्याची घोषणा केली होती. त्यानंतर शिवसेनेच्या लोकसभेतील एकनाथ शिंदे गटाला लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी हिरवा कंदील दाखवत राहुल शेवाळे यांना गटनेते म्हणून नियुक्त केले होते.