Posts

ताज्या बातम्या

गिरीश बापट यांच्या निधनाचं वृत्त अत्यंत दुःखद - शरद पवार

गिरीश बापट यांना सर्वच पक्षातील नेत्यांनी, विविध क्षेत्रातील नामवंतांनी श्रद्धांजली वाहिली आहे.

पुणे

वैकुंठ स्मशनभूमीत सायं. ७ वाजता बापट यांच्यावर होणार अंत्यसंस्कार

अंत्यविधीसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित राहणार आहेत. तसेच शहरासह राज्यातील विविध पक्षाचे नेते मंडळी हे देखील उपस्थित राहणार आहेत.

महाराष्ट्र

लाच स्वीकारताना आख्खं कृषी कार्यालय सापडलं, सर्वांना झाली अटक

खुलताबाद तालुका कृषी अधिकारी कार्यालयातील अधिकारी, कर्मचाऱ्यांवर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) कारवाई केली.

देश - विदेश

मजुराच्या बँक खात्यावर चुकून पैसे जमा झाले, मोदींनी पैसे दिल्याचा समज

बीडी कामगाराच्या बँक खात्यावर चुकून दुसऱ्याच एका महिलेचे पैसे जमा झाले. कामगाराला वाटले पंतप्रधान योजनेतून पैसे मिळाले. आता पर्यंत १ लाख रुपये खर्च करून बसला.

देश - विदेश

सावरकर वादावरून शरद पवारांनी केली राहुल गांधींची कानउघाडणी

शरद पवार म्हणाले, “सावरकर आणि आरएसएस यांचा संबंध नाही. सावरकर माफीवीर म्हणणं योग्य नाही.”

देश - विदेश

आधार-पॅनकार्ड लिंक करण्यासाठी ३० जूनपर्यंत मुदतवाढ!

केंद्रातील मोदी सरकारने एक गुड न्यूज दिली आहे. पॅन कार्डला आधार कार्डशी लिंक करण्याला आता मुदतवाढ मिळाली आहे. ३० जून २०२३ पर्यंत ही मुदतवाढ आहे. आधी ३१ मार्च २०२३ पर्यंत डेडलाइन ठरवली गेली होती.

ताज्या बातम्या

गुणरत्न सदावर्ते यांची वकिलीची सनद रद्द

एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनात त्यांनी वकिलाचा पोशाख घालून नृत्य केल्याने ते अडचणीत आले आहेत. याच सोबत काळा कोट परिधान करुन त्यांनी हाताला पट्टी बांधून आंदोलनात सहभाग घेतला होता.

पुणे

मुंबई-पुणे एक्स्प्रेसवेवरील टोल दरात तब्बल १८ टक्के वाढ

मुंबई-पुणे एक्सप्रेस मार्गावरील प्रवास आता महागणार आहे. या मार्गावरील टोल दरात तब्बल १८ टक्क्यांनी वाढ करण्यात आली आहे.

देश - विदेश

राहुल गांधींच्या समर्थनार्थ लोक रस्त्यावर येत नसल्याने चिदंबरम नाराज

राहुल गांधी यांच्यासाठी लोक रस्त्यावर येत नाहीत आणि त्यामुळे त्यांची निराशा झाली आहे, असे पी चिदंबरम म्हणाले. ते म्हणाले की, अनेक वर्षांपासून जनता कोणत्याही प्रश्नासाठी रस्त्यावर येत नाही.

राजकारण

सावरकरांच्या मुद्द्यावरून महाविकास आघाडी दोन गटात विभागली

काँग्रेसचे राष्ट्रीय नेते राहुल गांधी यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याबद्दल केलेल्या वक्तव्यामुळे ठाकरे गट आक्रमक झाल्याचे पाहायला मिळत आहे. कारण आज सोमवारी (ता. २७ मार्च) काँग्रेसच्या डिनर पार्टीवर ठाकरे गटाच्या खासदारांनी बहिष्कार टाकला आहे.

राजकारण

गांधी हत्या सावरकरांमुळेच झाली – काँग्रेस प्रवक्ते अतुल लोंढे (व्हिडिओ)

काँग्रेसचे महाराष्ट्राचे मुख्य प्रवर्तक अतुल लोंढे यांनीही काँग्रेसची भूमिका स्पष्ट करत सावरकरांविषयी काँग्रेसचे असलेले मत बदलणार नसल्याचे सांगितले आहे.

देश - विदेश

बापरे ! केळी 500 रुपये डझन आणि द्राक्षे 1600 रुपये किलो

सध्या रमजानचा काळ सुरू आहे. या काळात मुस्लिम बांधव उपवास करतात. मात्र पाकिस्तानमध्ये महागाईने कळस गाठला आहे. केळी ५०० रुपये डझन व द्राक्षे १६०० रुपये भावाने विकली जात आहेत. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना उपवास करणे अवघड झाले आहे.

अर्थ

बँकिंग क्षेत्रात सायबर गुन्हे रोखण्यासाठी खबरदारी घ्यावी - कॉ. व्ही. सी. जोशी

भारतातील सायबर फसवणुकीचे प्रकार पाहता सरकारने डिजीटल ॲक्ट  कडक करून अंमलबजावणी केली पाहिजे. अशाप्रकारचा कायदा जर्मनीने केला असून तो जगातील पहिला देश आहे.

शैक्षणिक/करिअर

विद्यार्थी-प्राध्यापकांना जपानमध्ये संशोधनाची संधी

जपानच्या शिष्टमंडळाने इलेक्ट्रॉनिक्स विभागास भेट देऊन प्रयोग शाळेची पाहणी केली. विद्यार्थ्यांनी तयार केलेले प्रकल्प पाहून त्यांच्याशी संवाद साधला.

पुणे

पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे नदी पात्रात चिपको आंदोलन सुरू

पुण्यातील नदी पात्रातील झाडे महानगरपालिका तोडणार आहे. ही झाडे वाचविण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते झाडावर चढून आंदोलन करीत आहेत.