वैकुंठ स्मशनभूमीत सायं. ७ वाजता बापट यांच्यावर होणार अंत्यसंस्कार

अंत्यविधीसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित राहणार आहेत. तसेच शहरासह राज्यातील विविध पक्षाचे नेते मंडळी हे देखील उपस्थित राहणार आहेत.

A PHP Error was encountered

Severity: Notice

Message: Undefined property: stdClass::$link

Filename: post/_post_share_box.php

Line Number: 27

Backtrace:

File: /home/prabo1/public_html/application/views/post/_post_share_box.php
Line: 27
Function: _error_handler

File: /home/prabo1/public_html/application/views/post/post.php
Line: 78
Function: view

File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 294
Function: view

File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 119
Function: post

File: /home/prabo1/public_html/index.php
Line: 326
Function: require_once

वैकुंठ स्मशनभूमीत सायं. ७ वाजता बापट यांच्यावर होणार अंत्यसंस्कार

पुणे, दि. २९ मार्च - पुण्यातील दीनानाथ रुग्णालयात उपचारादरम्यान गिरीश बापट यांचे निधन झाले आहे. गिरीश बापट मागे मुलगा बायको, सून, आणि नात असा परिवार आहे. गिरीश बापट यांची अंत्यविधी संध्याकाळी 7 वाजता वैकुंठ स्मशानभूमीत करण्यात येणार आहे. गिरीश बापट हे 1973 पासून ते राजकारणात सक्रिय होते.

आजचा दिवस अत्यंत वाईट दिवस असून खूपच दुःखद घटना आज घडली आहे. भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि पुण्याचे खासदार गिरीश बापट यांचे आज निधन झाले आहे. गेल्या दीड वर्षपासून ते आजाराशी झुंज देत होते. आज अखेर त्यांची झुंज अयशस्वी झाली आहे. पुण्यातील वैकुंठ स्मशनभूमीत सायंकाळी 7 वाजता अंत्यसंस्कार होणार आहेत, अशी माहिती शहराध्यक्ष जगदीश मुळीक यांनी दिली. अंत्यविधीसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित राहणार आहेत. तसेच शहरासह राज्यातील विविध पक्षाचे नेते मंडळी हे देखील उपस्थित राहणार आहेत.

ऑक्सिजन लावून प्रचार केला

गेल्या काही महिन्यांपासून खासदार गिरीश बापट यांना श्वसनाच्या आजार झाला होता. त्याच्यावर उपचार सुरू होते. नुकतेच झालेल्या कसबा पोटनिवडणुकीत ऑक्सिजन लावून प्रचार तसेच मतदान केले होते. दोन दिवसांपूर्वी बापट यांची प्रकृती खालावल्याने त्यांना पुन्हा दीनानाथ रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होत. शेवटी आज त्यांनी अखेरचा श्वास घेतला आहे.

आजारी असताना नेत्यांनी घेतली भेट

कसबा पोट निवडणुकीच्या माध्यमातून राज्यातील सर्वच नेते मंडळींनी खासदार गिरीश बापट यांची भेट घेत प्रकृतीची विचारपुस देखील केली होती. गिरीश बापट आजारी असताना विरोधी पक्षाच्या नेत्यांनीही त्यांची भेट घेतली होती. त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली होती. तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार या नेत्यांनीही भेट घेतली होती व प्रकृतीची विचारपूस केली. या घटनेमुळे भाजपमध्ये मोठी पोकळी निर्माण झाली आहे.

सदाशिव पेठेतील ब्राह्मणांपासून गरीब मुस्लिमांपर्यंत सर्वांना आपला वाटणारा नेता

गिरीश बापट यांच्या निधनामुळं एक सर्वसमावेशक नेतृत्व हरपल्याची भावना व्यक्त होत आहे. याचं कारण बापट यांच्या स्वभावात आणि संस्कारात होतं. त्यांच्या याच मोकळेपणामुळं व आपलेपणामुळं ते कधीच विशिष्ट वर्गाचे नेते राहिले नव्हते. ते खऱ्या अर्थानं लोकप्रतिनिधी ठरले होते. बापट हे भाजपचे नेते असले तरी सर्वच पक्षांच्या नेत्यांशी त्यांचे उत्तम संबंध होते. लोकांच्या पातळीवरही हेच होतं. जात, धर्म, पंथ, प्रांत, भाषा, पक्षभेदांच्या भिंती ओलांडून त्यांनी समाजकार्य, विकासाचं राजकारण केलं.

सर्वसमावेशकता हा बापट यांच्या राजकारणाचा केंद्रबिंदू होता. सर्वांना सोबत घेऊन जाण्यावर त्यांचा विश्वास होता. मोकळ्या-ढाकळ्या स्वभावामुळं विरोधी पक्षाच्या नेत्यांशीही ते सहज जुळवून घेत. कसब्यातील ब्राह्मण मतदार जितका हक्कानं बापट यांच्याकडं यायचा, तितक्याच प्रेमानं झोपडपट्टीतील गरीब आणि मुस्लिम मतदारांना बापट आपले वाटायचे. त्यांच्या राजकीय यशाचं हेच गमक होतं.

गिरीश बापट यांचा मूळचा पुण्याचा, तळेगाव दाभाडे इथला. पुण्यातच त्यांचं बालपण गेलं. बापट हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुशीत तयार झाले होते. पदवीधर असलेले बापट हे टेल्को कंपनीत कामगार नेते होते. १९८० साली भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून ते राजकारणात सक्रिय झाले. त्यांना पुणे भाजपचे सचिव म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आली. पुढं ते पुणे महापालिकेचे नगरसेवक, स्थायी समिती अध्यक्ष, आमदार व खासदार पदापर्यंत पोहोचले. राज्य सरकारमध्ये मंत्रिपद भूषवण्याची संधीही त्यांना मिळाली होती. पुणे जिल्ह्याचं पालकमंत्री पद त्यांनी भूषवलं होतं.

चार दशकांच्या प्रदीर्घ राजकीय वाटचालीत त्यांना पुणेकरांचं अलोट प्रेम मिळालं. काही महिन्यांपासून त्यांची प्रकृती ठीक नव्हती. आजाराशी ते निर्धारनं लढत होतं. बरे होऊन सार्वजनिक जीवनात ते पुन्हा सक्रीय होतील, हा विश्वास आम्हा सगळ्यांना होता. नुकत्याच कसबा पेठ विधानसभा मतदारसंघात झालेल्या पोटनिवडणुकीच्या प्रचारात भाजपनं त्यांना एका कार्यक्रमात आणलं होतं. त्यावेळी त्यांची प्रकृती ठीक नव्हती. त्या अवस्थेत बापट यांना पाहून मतदारही हळहळले होते. आज त्यांच्या निधनामुळं एक हक्काचा माणूस गमावल्याची भावना पुणेकर व्यक्त करत आहेत.