गिरीश बापट यांच्या निधनाचं वृत्त अत्यंत दुःखद - शरद पवार
गिरीश बापट यांना सर्वच पक्षातील नेत्यांनी, विविध क्षेत्रातील नामवंतांनी श्रद्धांजली वाहिली आहे.
A PHP Error was encountered
Severity: Notice
Message: Undefined property: stdClass::$link
Filename: post/_post_share_box.php
Line Number: 27
Backtrace:
File: /home/prabo1/public_html/application/views/post/_post_share_box.php
Line: 27
Function: _error_handler
File: /home/prabo1/public_html/application/views/post/post.php
Line: 78
Function: view
File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 294
Function: view
File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 119
Function: post
File: /home/prabo1/public_html/index.php
Line: 326
Function: require_once
पुणे, दि. २० एप्रिल – खासदार गिरीश बापट यांचे आज (बुधवारी) निधन झाले. त्यांच्या निधनाने भाजपवर शोककळा पसरली आहे. गेल्या तीन महिन्यात पुणे जिल्ह्यात भाजपने तीन लोकप्रतिनिधी गमावले आहेत. आमदार मुक्ताताई टिळक, आमदार लक्ष्मण जगताप यांच्या निधनानंतर तीन महिन्यातच बापट यांच्या निधनाने भाजपमध्ये मोठी पोकळी निर्माण झाली आहे.
पुणे लोकसभा मतदारसंघाचे खासदार गिरीश बापट यांच्या निधनाचे वृत्त अत्यंत दुःखद आहे. चार दशकांच्या प्रदीर्घ कारकीर्दीत गिरीश बापट यांनी नेहमीच सर्वसमावेशक भूमिका घेत राजकीय प्रवास केला. अशा शब्दांमध्ये शरद पवार यांनी ट्वीट करून त्यांनी आपल्या भावनांना वाट करून दिली आहे.
प्रतिकूल काळात पुण्यात भाजपला वाढवण्यात गिरीषजींचे मोठे योगदान !
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी गिरीष बापट यांना श्रद्धांजली अर्पण केली. तसे ट्विट गडकरींनी केले आहे. त्यामध्ये ते म्हणतात, ‘गिरीषजी बापट यांच्या निधनाचे वृत्त ऐकून अतिशय दु:ख झाले. जनसंघाच्या काळापासून पुणे शहरात गेली पाच दशके सक्रिय राजकारणात असणारे, पूर्वीपासून विधिमंडळात व आता लोकसभेतील माझे जिवलग सहकारी, पुण्यामध्ये भाजपच्या जडणघडणीतील एक प्रमुख व क्रियाशील नेतृत्व असणाऱ्या गिरीषजींना माझी भावपूर्ण श्रद्धांजली.
जमिनीशी नाळ ठेवणारे बापट राजकारणातील अष्टपैलू व्यक्तिमत्त्व
राजकारणातील एक उत्तुंग आणि अष्टपैलू व्यक्तिमत्त्व आपल्यातून निघून गेल्याची भावना भाजप नेते, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केली. ते म्हणाले, "भाजपचे ज्येष्ठ नेते, पुण्याचे खासदार गिरीश बापट यांच्या निधनाचे वृत्त अत्यंत दु:खद आणि धक्कादायक आहे. पक्षनिष्ठ, पण पक्षापलिकडे जिव्हाळ्याचे संबंध जोपासणारे, सातत्याने जमिनीशी नाळ ठेवणारे, राजकारणातील एक उत्तुंग आणि अष्टपैलू व्यक्तिमत्त्व आपल्यातून निघून गेले आहे."
“भाऊ…तुमच्या छत्रछायेत मी लहानाची मोठी झाले…
गिरीश बापट यांच्या निधनानंतर अनेक राजकीय नेत्यांनी शोक व्यक्त केला आहे. मराठी अभिनेत्री रुचिता जाधवने गिरीश बापट यांना पोस्टद्वारे श्रद्धांजली वाहिली आहे. रुचिताने गिरीश बापट यांच्याबरोबरचा फोटो तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन शेअर केला आहे. अभिनेत्रीने गिरीश बापट यांच्या निधनानंतर भावूक पोस्ट शेअर केली आहे.
“भाऊ…तुमच्या छत्रछायेत मी लहानाची मोठी झाले…आज माझ्या आयुष्यात अशी पोकळी निर्माण झाली की ती कधीच भरू शकणार नाही…वडिलांसारखी तुमची माया आणि शाब्बासकीची थाप मला कोण देणार…तुम्हांला विसरणे तर शक्यच नाही…भावपूर्ण श्रद्धांजली भाऊ” , असं म्हणत रुचिताने गिरीश बापट यांना श्रद्धांजली वाहिली आहे.
साहेबांचं जाणं चटका लावून गेलं
भाजप खासदार गिरीश बापट यांचं पुण्यात निधन झालं. दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात बुधवार २९ मार्च रोजी सकाळी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.गिरीश बापट यांच्या जाण्यानं कार्यकर्त्यांना अश्रू अनावर झाले आहेत.भाऊंचं जाणं मनाला चटका लावून गेलं अशी प्रतिक्रिया देत संदीप खर्डेकरांना रडू आवरलं नाही. कधीच कोणासमोर हार न माननारे भाऊ मृत्यूसमोर कसे हारले? असा सवाल विचारत खर्डेकर यांना अश्रू अनावर झाले होते.
राजकारणापलीकडे त्यांची माणुसकी होती
भाजप खासदार गिरीश बापट यांच्या जाण्याने आमदार रवींद्र धंगेकरही भावूक झाले. भाऊंकडून खूप शिकायला मिळालं अशी प्रतिक्रिया रवींद्र धंगेकरांनी दिली. दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात बुधवारी २९ मार्च रोजी सकाळी गिरीश बापट यांनी अखेरचा श्वास घेतला. गिरीश बापट यांच्या जाण्यानं कार्यकर्त्यांनाही अश्रू अनावर झाले आहेत.