विकत दिला नाही म्हणून चोरून नेलेला बैल अखेर मालकाच्या स्वाधीन 

A PHP Error was encountered

Severity: Notice

Message: Undefined property: stdClass::$link

Filename: post/_post_share_box.php

Line Number: 27

Backtrace:

File: /home/prabo1/public_html/application/views/post/_post_share_box.php
Line: 27
Function: _error_handler

File: /home/prabo1/public_html/application/views/post/post.php
Line: 78
Function: view

File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 294
Function: view

File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 119
Function: post

File: /home/prabo1/public_html/index.php
Line: 326
Function: require_once

विकत दिला नाही म्हणून चोरून नेलेला बैल अखेर मालकाच्या स्वाधीन 
पुणे  -
शर्यतीचा बैल विकत दिला नाही म्हणून तो चक्क चोरून नेल्याची घटना बारामती तालुक्यात घडली. याप्रकरणी अखेर पोलीसांनी हस्तक्षेप केल्यानंतर खिलार बैल मालकाच्या स्वाधीन करण्यात आला.

मुळचे आष्टी तालुक्यातील (जि. बीड) असलेले ऊसतोड मजूर रमेश रामा करगळ हे ऊसतोडणीसाठी कुटुंबीयांसोबत जनावरांनाही घेऊन बारामती गेले होते. गेल्या काही दिवसांपासून बारामती तालुक्यातील मानाजीनगर येथे ऊसतोडणी करीत होते. दरम्यानच्या काळात त्यांच्याकडे असलेल्या खिलार बैल विकायचा का? अशी अनोळखी इसमांनी विचारणा केली होती. मात्र, लहानपणापासून सांभाळ केलेल्या बैलाची विक्री करायची नाही असे त्यांनी सांगितले. मात्र, दुसऱ्याच दिवशी रमेश हे ऊसतोडणीसाठी फडावर गेले असता त्यांच्या बैलाची चोरी झाल्याचे निदर्शनास आले. त्यांनी आजूबाजूला चौकशी केली मात्र, खोडाचा काही पत्ता लागला नाही.

बैलाची चोरी झाल्याची फिर्याद कशी नोंदवायची अशा विवंचनेत तक्रार न नोंदवता रमेश यांनी शोधकार्य कायम ठेवले. पण एका स्थानिकाने त्यांना फिर्याद नोंदवण्य़ास मदत केली. चौकशीअंती मानाजीनगर गावात चाकण भागातील काही लोक खिलार खोंड खरेदीसाठी येऊन गेल्याची माहिती पोलीसांना मिळाली. सखोल चौकशी केल्यानंतर वडगांव निंबाळकर पोलीस ठाण्याच्या पोलीसांनी तिघांना ताब्यात घेऊन रमेश करगळ यांना त्यांचा खिलार खोंड परत केले. तिन्हीही आरोपी हे खेड तालुक्यातील असल्याचे समोर आले आहे.