सेवाक्षेत्रात नोकरीची मोठी संधी उपलब्ध - डॉ काळकर

A PHP Error was encountered

Severity: Notice

Message: Undefined property: stdClass::$link

Filename: post/_post_share_box.php

Line Number: 27

Backtrace:

File: /home/prabo1/public_html/application/views/post/_post_share_box.php
Line: 27
Function: _error_handler

File: /home/prabo1/public_html/application/views/post/post.php
Line: 78
Function: view

File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 294
Function: view

File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 119
Function: post

File: /home/prabo1/public_html/index.php
Line: 326
Function: require_once

सेवाक्षेत्रात नोकरीची मोठी संधी उपलब्ध - डॉ काळकर

* आयआय सीएमआर मध्ये राष्ट्रीय परिषद संपन्न*

पिंपरी - बदलत्या जीवनशैलीमुळे व्यावसायाचा ट्रेंड बदलत आहे. ग्राहकांच्या मागणीनुसार कंपन्या उत्पादने निर्माण करीत असले तरी उत्पादन क्षेत्रापेक्षा सेवा क्षेत्रात तरुणांना नोकरीची मोठ्या प्रमाणात संधी उपलब्ध होणार आहे.असे मत सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील वाणिज्य व व्यवस्थापन विभागाचे अधिष्ठाता डॉ. पराग काळकर यांनी व्यक्त केले.

निगडी येथील इंस्टिट्यूट ऑफ़ इंडस्ट्रियल ॲंड कंप्युटर मॅनेजमेंट ॲन्ड रिसर्च (आयआय सीएमआर) एमबीए विभागाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या आंतरराष्ट्रीय परिषदेत ते बोलत होते.

या वेळी थायलंड येथील बिर्ला ग्रूपचे महासंचालक जगदीश बारीक यांनी इंजिनिअरिंग उद्योगक्षेत्रातील घडत असलेल्या घडामोडींचा ऑनलाईन आढावा घेतला.

यावेळी सूर्यदत्ता इन्स्टिट्यूटचे संचालक डॉ.शैलेश कासंडे, डॉ आशुतोष मिसाळ,  डॉ भरत कासार, इंदिरा इन्स्टिट्यूटच्या डॉ. पूर्णा शंकर, डॉ. सुधीर हसमनीस, डॉ. सूर्यकांत कट्टी, आयआयसीएमआरचे संचालक डॉ अभय कुलकर्णी, डॉ मनिषा कुलकर्णी आदी उपस्थित होते.

डॉ. अभय कुलकर्णी यांनी प्रास्ताविक भाषणात म्हणाले की, उद्योगधंद्यातील पुनर्रचना व पुनर्बांधणीची आवश्यकता असल्यासचे सांगितले. एमबीए विभागप्रमुख डॉ. मनीषा कुलकर्णी यांनी विविध उदाहरणासह उद्योगक्षेत्रातील बदलांची आवश्यकता आहे असे प्रतिपादन केले.

सूत्रसंचालन चित्रा गुरुराणी व दिशा राय तर आभार परिषदेच्या समन्वयक डॉ जयश्री मुरली यांनी मानले. या परिषदेमध्ये २०० शोधनिबंध आले होते. यापैकी ९६ शोधनिबंधांचा समावेश करण्यात आला. थायलंड, सिंगापूर, कॅनडा, नेपाळ, सिडनी, कॅलिफोर्निया या देशातील तज्ञ प्रतिनिधींनी मार्गदर्शन केले.

सांगता समारंभ प्रसंगी प्राज इंडस्ट्रीजचे व्यवस्थापकीय संचालक शिशीर जोशीपुरा, कॅनडा येथील पील प्रोफेशनल स्टडीज कॉलेजचे अध्यक्ष डॉ. चित्रलेखा पोतनीस, नेपाळ येथील संजय पुदासेनी, आय आय सीएम आरचे संचालक डॉ अभय कुलकर्णी यांनी मार्गदर्शन केले.

कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी डॉ. विनोद भेलोसे, डॉ. मधुरा देशपांडे, प्रा. स्वप्निशा खंबायत, डॉ.  राजेंद्र आगवणे, डॉ. दीप्ती शर्मा, प्रा. दीप्ती बाजपेयी, प्रा. दिलीप पवार, प्रा. हर्षल पाटील, प्रा. पूजा नलावडे, प्रा. पूजा गवांदे यांनी विशेष परिश्रम घेतले.