भारतामधील सध्याची परिस्थिती पाहून माझे हदय विदीर्ण झालेय - सत्य नाडेला 

भारतामधील सध्याची परिस्थिती पाहून माझे हदय विदीर्ण झालेय - सत्य नाडेला 

मायक्रोसॉफ्ट-गुगल मदतीसाठी पुढे सरसावले

भारतासाठी गुगलकडून 135 कोटींचा निधी  

नवी दिल्ली, (प्रबोधन न्यूज) - भारतामधील सध्याची कोरोना परिस्थिती पाहून माझे हदय विदीर्ण झाले आहे. अमेरिकेने भारताला मदत करण्याचा निर्णय घेतल्याबद्दल मी आभारी आहे. कोरोनावरील उपचारांसाठी लागणारी आर्थिक मदत, वैद्यकीय उपकरणे आणि ऑक्सिजन कॉन्सट्रेटर्सच्या खरेदासाठी मायक्रोसॉफ्ट आवाज उठवत राहील, असे सत्या नाडेला यांनी ट्विट करून सांगितले. 

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेच्या थैमानामुळे झालेल्या विध्वंसानंतर आता जगभरातील अनेक देश भारताच्या मदतीसाठी पुढे सरसावले आहेत. आंतरराष्ट्रीय पातळीवरुन भारताकडे मदतीचा ओघ सुरु झाला असतानाच आता मायक्रोसॉफ्ट आणि गुगल या जगातील दोन बलाढ्य कंपन्यानीही भारताकडे मदतीचा हात पुढे केला आहे.  मायक्रोसॉफ्टचे मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) सत्या नाडेला आणि गुगलचे सीईओ सुंदर पिचाई यांनी ट्विट करुन ही माहिती दिली. 

गुगलचे सीईओ सुंदर पिचाई यांनी भारताला वैद्यकीय मदत करण्यासाठी गुगलकडून 135 कोटींचा निधी पुरविली जाईल, अशी घोषणा केली. गिव्ह इंडिया, युनिसेफ, स्वयंसेवी संस्थांच्या माध्यमातून ही मदत पुरविली जाईल, असे सुंदर पिचाई यांनी स्पष्ट केले.