औंध ते जगताप डेअरी रस्त्याची निविदा निघणार ; राहूल कलाटे यांची माहिती 

A PHP Error was encountered

Severity: Notice

Message: Undefined property: stdClass::$link

Filename: post/_post_share_box.php

Line Number: 27

Backtrace:

File: /home/prabo1/public_html/application/views/post/_post_share_box.php
Line: 27
Function: _error_handler

File: /home/prabo1/public_html/application/views/post/post.php
Line: 78
Function: view

File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 294
Function: view

File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 119
Function: post

File: /home/prabo1/public_html/index.php
Line: 326
Function: require_once

औंध ते जगताप डेअरी रस्त्याची निविदा निघणार ; राहूल कलाटे यांची माहिती 
पिंपरी- 
स्मार्ट सिटीद्वारे औंध येथील राजीव गांधी पुल ते जगताप डेअरी चौकापर्यंतच्या रस्त्याचे अर्बन स्ट्रीट डिझाईननुसार काम करण्यात येणार होते. हे 40 कोटी रुपयांचे काम थेट पद्धतीने शिर्के कन्स्ट्रक्‍शनला देण्याचा घाट सत्ताधारी भाजपने घातला होता. मात्र, तक्रार केल्यानंतर आयुक्त राजेश पाटील यांनी हे काम थेट पद्धतीने न देता निविदेद्वारे करण्याचा निर्णय घेतल्याची माहिती शिवसेनेचे गटनेते राहुल कलाटे यांनी शुक्रवारी (दि.4) पत्रकार परिषदेत दिली. आयुक्तांच्या या निर्णयामुळे सत्ताधाऱ्यांचा भ्रष्टाचारी कारभाराचा रथ रोखल्याचे कलाटे म्हणाले. 
औंध ते किवळे या 14 किलोमीटर अंतराच्या बीआरटीएस मार्गावर अर्बन स्ट्रीट डिझाईननुसार काम केले जाणार आहे. तसेच, ड्रेनेज समपातळीवर करून डांबरीकरण केले जाणार आहे. त्यासाठी सुमारे 100 कोटींचा खर्च अपेक्षित आहे. मात्र, हा रस्ता सुस्थितीत असतानाही केवळ टक्केवारीसाठी काम काढण्यात आले आल्याचा तसेच हे काम ठराविक ठेकेदाराला थेट पद्धतीने देण्याचा घाट घातल्याचा आरोप करत महापालिका आयुक्तांकडे राहूल कलाटे यांनी तक्रार केली होती.
 
या तक्रारींची दखल घेत औंध ते जगताप डेअरी रस्ताचे काम थेट पद्धतीने न देता या कामासाठी निविदा काढण्यात येणार असल्याचे उत्तर आयुक्तांनी दिले आहे. त्यावर कलाटे यांनी आयुक्तांच्या निर्णयावर समाधान व्यक्त करत बीआरटीसाठी यापूर्वी केलेल्या कामांची आयुक्तांनी चौकशी करावी, अशी मागणीही केली आहे.