जाधववाडी-चिखलीत साकारणार पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालय!

A PHP Error was encountered

Severity: Notice

Message: Undefined property: stdClass::$link

Filename: post/_post_share_box.php

Line Number: 27

Backtrace:

File: /home/prabo1/public_html/application/views/post/_post_share_box.php
Line: 27
Function: _error_handler

File: /home/prabo1/public_html/application/views/post/post.php
Line: 78
Function: view

File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 294
Function: view

File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 119
Function: post

File: /home/prabo1/public_html/index.php
Line: 326
Function: require_once

जाधववाडी-चिखलीत साकारणार पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालय!

     पिंपरी ,  (प्रबोधन न्यूज )   -   पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालय उभारण्यासाठी जागा निश्चितीचा बहुप्रतिक्षीत निर्णय अखेर झाला. जाधववाडी-चिखली येथील गट. नं. ५३९ मधील ३ हे. ३९ आर. शासकीय जमीन पोलीस आयुक्तालय कार्यालय, निवासस्थान आणि परेड ग्राऊंड प्रयोजनाकरिता प्रदान करण्यासाठी राज्य शासनाच्या महसूल व वन विभागाने मान्यता दिली.

मुंबई येथे सुरू असलेल्या राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाच्या निमित्ताने भाजपा आमदार महेश लांडगे यांनी पोलीस आयुक्तालय, चिखली पोलीस स्टेशनसाठी जागा व दापोडी पोलीस स्टेशनची निर्मिती याबाबत राज्याचे उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली आणि संबंधित विषय मार्गी लावण्याबाबत आग्रही मागणी केली होती.

आमदार महेश लांडगे म्हणाले की, पिंपरी-चिंचवड स्वतंत्र पोलीस आयुक्तालय निर्मितीचा लढा आपण यशस्वी केला. दि. १५ ऑगस्ट २०१८ रोजी राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्याहस्ते आयुक्तालयाचे कामकाज सुरू झाले. पण, आयुक्तालयासाठी स्वतंत्र- हक्काची इमारत नव्हती. त्यासाठी राज्य सरकार आणि संबंधित विभागांकडून सातत्त्याने पाठपुरावा केला. त्याला यश मिळाले.

भोसरी विधानसभा मतदार संघातील जाधववाडी, चिखली येथील गट नंबर ५३९ पै. मधील ३ हे.३९ आर. जागेत पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाची भव्य वास्तू उभारण्याचा मार्ग मोकळा झाला. याठिकाणी पोलीस अधिकारी निवासस्थान व परेड ग्राऊंड होणार आहे. तसेच, चिखली पोलीस स्टेशनच्या इमारतीसाठी ९ गुंठे जागा निश्चित केली आहे. त्यामुळे आयुक्तालय, चिखली पोलीस स्टेशनच्या उभारणीचा मार्ग मोकळा झाला आहे, असेही आमदार लांडगे म्हणाले.

पोलीस आयुक्त, पिंपरी-चिंचवड, पुणे सदर शासकीय जमिनीचा वापर केवळ मंजूर प्रयोजनासाठी करील. तसेच, जमिनीचा ताबा मिळाल्यापासून ३ वर्षांच्या आत मंजूर प्रयोजनासाठी वापर सुरू करणे बंधनकारक राहील, अशा अटींवर या जागेला मान्यता देण्यात आली आहे.

माझ्या मतदार संघातील मोशी-चिखली या भागात पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालय उभारण्यासाठी जागा निश्चित करण्यात आली. पिंपरी-चिंचवड न्यायालय, शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय, प्रस्तावित मोशी शासकीय मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल, आंतरराष्ट्रीय औद्योगिक प्रदर्शन व कन्व्हेन्शन सेंटर आणि विशेष म्हणजे, भारतातील पहिले ‘‘संविधान भवन’’ उभारले जात आहे. त्यामुळे समाविष्ट गावांतील हा परिसर आता ‘प्रशासकीय संस्थांचा केंद्रबिंदू’ म्हणून नावारुपाला येत आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस व महायुती सरकारचे तमाम पिंपरी-चिंचवडकरांच्या वतीने मन:पूर्वक आभार व्यक्त करतो.
- महेश लांडगे, आमदार, भोसरी विधानसभा, भाजपा, पिंपरी-चिंचवड.