'मुलांनो, बापाचे मालक होऊ नका !' परळी आगाराच्या वाहकाचा सल्ला सोशल मीडियावर व्हायरल
A PHP Error was encountered
Severity: Notice
Message: Undefined property: stdClass::$link
Filename: post/_post_share_box.php
Line Number: 27
Backtrace:
File: /home/prabo1/public_html/application/views/post/_post_share_box.php
Line: 27
Function: _error_handler
File: /home/prabo1/public_html/application/views/post/post.php
Line: 78
Function: view
File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 294
Function: view
File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 119
Function: post
File: /home/prabo1/public_html/index.php
Line: 326
Function: require_once
बीड - प्रवासासाठी लेकरांनी दिलेले अवघे ५५ रुपये घेऊन निघालेली वयोवृद्ध व्यक्ती, बसमध्ये जेव्हा भाडेवाढ झाली आहे आणि तिकिटाला ६० रुपये लागतात असे कळल्यानंतर चेहऱ्यावरची हताशा लपविताना त्या व्यक्तीच्या डोळ्यात तराळलेले अश्रू एका वाहकाला अस्वस्थ करून गेले आणि त्याच अस्वस्थतेतून 'तिकिटाचे पाच रुपये तशी फार मोठी गोष्ट नाही पण मुलांनो, बापाचे मालक होऊ कधी नका' हा वाहकाने दिलेला सल्ला सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होतोय. असंवेदनशील होत चाललेल्या समाजव्यवस्थेने आणि जर्जर झालेल्या कुटुंब व्यवस्थेने आत्मपरीक्षण करण्याची गरज व्यक्त होत आहे.
दोन दिवसापूर्वी परळी आगाराचे वाहक गणेश राडकर लातूर-परळी बसवर कर्तव्यास होते. दुपारी 2 वाजता लातूरहून बस परळीकडे निघाली. यावेळी गाडीत एक आजोबा येऊन बसले. गाडी काही अंतरावर गेल्यानंतर राडकर यांनीतिकीट काढायला सुरुवात केली. त्या आजोबांना तिकिटाचे पैसे मागितले, यावेळी त्यांनी हाफ तिकीट सांगत 55 रुपये हातावर टेकवले. आणखी 5 रुपये द्या असं राडकर त्यांना बोलले. तिकीट तर 55 रुपये असताना 60 कसे असं त्या आजोबानी विचारले. यावेळी त्यांना तिकीटदर वाढल्याचे वाहकांनी सांगितले. यावेळी त्यांनी खिशात हात घालून पाहणी केली पण पैसे नसल्याने त्यांनी 'मुलाने एवढेच पैसे खर्चीसाठी दिल्याचे सांगितले', हे सांगताना त्या आजोबाच्या नजरेत एक प्रकारची हताशा होती. ती हताश आणि चेहऱ्यावरची हतबलता , डोळ्यात तराळणारे पाणी वाहक राडकर यांना अस्वस्थ करून गेली आणि त्यांनी या घटनेचा उल्लेख करून 'खरं तर एवढ्या उन्हात प्रवास करताना तहान, भूक लागू शकते असं विचार न करता केवळ 55 रुपये बापाच्या हातावर टेकवणाऱ्या मुलाचा विचार सतत मनात घोळत होता. तिकिटाचे पाच रुपये तशी फार मोठी गोष्ट नाही पण मुलांनो, बापाचे मालक होऊ कधी नका' असा सल्ला देणारी पोस्ट सोशल मीडियावर टाकली. गणेश राडकर यांनी लातूर-परळी बसमधील वयोवृद्ध आजोबांचा शेयर केलेला किस्सा आज अनेकांसाठी चर्चेचा विषय ठरत आहे.