पर्यावरण पूरक गणेशोत्सव साजरा करा या मुख्यमंत्री यांच्या आवाहनाला शिवसेना उपनेते इरफान सय्यद यांची साथ
A PHP Error was encountered
Severity: Notice
Message: Undefined property: stdClass::$link
Filename: post/_post_share_box.php
Line Number: 27
Backtrace:
File: /home/prabo1/public_html/application/views/post/_post_share_box.php
Line: 27
Function: _error_handler
File: /home/prabo1/public_html/application/views/post/post.php
Line: 78
Function: view
File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 294
Function: view
File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 119
Function: post
File: /home/prabo1/public_html/index.php
Line: 326
Function: require_once
शहरातील गणेशभक्तांना शाडुच्या, मातीच्या गणेशमूर्ती शिवसेना उपलब्ध करून देणार
पिंपरी (प्रबोधन न्यूज ) - भारतासह देशविदेशात पोहोचलेला गणेशोत्सव काळानुरूप बदलत आहे. मात्र आज साजरे होणारा गणेशोत्सव हे पर्यावरणाला हानीकारक तर ठरत नाहीत ना, याकडे मात्र लक्ष देण्याची वेळ आली आहे.
गणपती हे आराध्य दैवत म्हणून ओळखले जाते. भाद्रपद शुद्ध चतुर्थीला गणरायाची विधिवत प्रतिष्ठापना करून त्याची मनोभावे पूजा केली जाते. गणेशोत्सवाचे महत्त्व लक्षात घेऊनच लोकमान्य टिळकांनी स्वातंत्र्यप्राप्तीसाठी लोकसहभाग महत्त्वाचा मानून त्याला सार्वजनिक रूप दिले. कोणताही उत्सव साजरा करताना पर्यावरणाचा ऱ्हास होणार नाही याची काळजी आपण सर्वांनी घेणे आवश्यक आहे. गणेशोत्सवामधील पावित्र्य आणि पर्यावरण संरक्षण यासाठी गणेशोत्सव पर्यावरण पूरक पद्धतीने साजरा होणे ही काळाची गरज आहे. यासाठी आपण सर्वांनी आग्रही राहिले पाहिजे. प्रत्येकाने आपला दृष्टिकोन पर्यावरणस्नेही ठेवला तरच उत्सव साजरे करण्याबाबत सामाजिक परिवर्तन होऊ शकेल. महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री श्री.एकनाथजी शिंदे साहेब यांनी ही पर्यावरण पूरक गणेशोत्सव साजरा करण्याचे आवाहन केले आहे त्यात जास्तीत जास्त घरगुती गणेशाची मूर्ती ही शाडूच्या मातीची किंवा मातीची असावी असे आवाहन करण्यात आले आहे.
आज आपण पर्यावरणाविषयी अधिक सजग झालो आहोत. त्यामुळे आपले प्रत्येक सण आणि उत्सव हे पर्यावरणपूरक पध्दतीने साजरे होणे आवश्यक आहे. अगदी काही दिवसांवर येउन ठेपलेला गणेशोत्सव सुध्दा पर्यावरणपूरकच असायला हवा, कारण पर्यावरणपूरक गणेशोत्सव ही काळाची गरज आहे. पर्यावरणाची काळजी घेऊन आपल्याला गणेशोत्सव साजरा करता येईल.. आपले सण आणि उत्सव जोरात आणि पर्यावरण पूरक साजरा व्हावा याकरिता राज्याचे लाडके मुख्यमंत्री श्री एकनाथजी शिंदे साहेब यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत शिवसेना उपनेते श्री.इरफान सय्यद यांच्या संकल्पनेतून गणेशभक्तांच्या करिता " ना नफा ना तोटा" या तत्त्वावर पर्यावरण पूरक मातीच्या गणेशमूर्ती उपलब्ध करून देण्यात येणार आहे. यामध्ये दगडूशेठ , सिंहासन , टिटवाळा , फेटा , मुकुट , अंभूजा या गणेशमूर्ती उपलब्ध असतील.
पिंपरी चिंचवड शहर शिवसेना यांच्या सहकार्याने हे अभियान राबविण्यात येणार आहे.
शाडूच्या मूर्तीसाठी स्टॉलधारकांनी संपर्क करावा.....
प्रा. श्री. दत्तात्रय भालेराव,
भोसरी विधानसभा प्रमुख,
8624866633
श्री. अरूनजी जोगदंड,
युवा सेना उपजिल्हा प्रमुख,
पुणे जिल्हा
9284049077
श्री. सुनील पवार,
प्रसिध्दी प्रमुख पिंपरी, चिंचवड शहर
9421666900