विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी पिंपरी चिंचवडमधील तळवडे येथील आग दुर्घटना स्थळाची केली पाहणी
A PHP Error was encountered
Severity: Notice
Message: Undefined property: stdClass::$link
Filename: post/_post_share_box.php
Line Number: 27
Backtrace:
File: /home/prabo1/public_html/application/views/post/_post_share_box.php
Line: 27
Function: _error_handler
File: /home/prabo1/public_html/application/views/post/post.php
Line: 78
Function: view
File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 294
Function: view
File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 119
Function: post
File: /home/prabo1/public_html/index.php
Line: 326
Function: require_once
पिंपरी, (प्रबोधन न्यूज)- धोकादायक आणि घातक पदार्थांमुळे अपघात होऊ शकतो अशा पदार्थांचा वापर आणि साठा करणाऱ्या पिंपरी चिंचवड औद्योगिक परिसरातील उद्योग व्यवसायांची तात्काळ माहिती संकलित करा, औद्योगिक क्षेत्रात सीसीटीव्ही यंत्रणा बसवा, असे निर्देश विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गो-हे यांनी दिले
पिंपरी चिंचवड परिसरात तळवडे येथील कारखान्यात झालेल्या दुर्घटना स्थळाची विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी पाहणी केली, त्यावेळी त्या बोलत होत्या.
यावेळी आमदार उमा खापरे, पिंपरी चिंचवड महापालिकेचे माजी नगरसेवक केशव घोळवे, शांताराम भालेकर, पंकज भालेकर यांच्यासह अतिरिक्त आयुक्त प्रदिप जांभळे पाटील, उप आयुक्त मनोज लोणकर, सहायक आयुक्त सीताराम बहुरे, आपत्ती व्यवस्थापन प्रमुख ओमप्रकाश बहिवाल, विशेष अधिकारी किरण गायकवाड, ज्येष्ठ वैद्यकीय अधिकारी डॉ. शिवाजी ढगे, उपअग्निशमन अधिकारी ऋषिकांत चिपाडे, औद्योगिक सुरक्षा संचलनालयचे संचालक देवीदास गोरे, सहसंचालक अखिल घोगरे, उपसंचालक योगेश पतंगे, तहसीलदार अर्चना निकम, पोलीस उपआयुक्त डॉ. काकासाहेब डोळे, सहायक आयुक्त पद्माकर घनवट आदी उपस्थित होते.
श्रीमती गोऱ्हे म्हणाल्या, तळवडे येथे घडलेली आगीची घटना अत्यंत दुर्दैवी आहे. घटनेतील जखमींच्या प्रकृतीत लवकर सुधारणा व्हावी यासाठी प्रयत्न सुरू आहेत. सरकार त्यांच्या पाठीशी उभे आहे, असे त्या म्हणाल्या. कामगारांची सुरक्षा हा महत्त्वाचा प्रश्न असून औद्योगिक क्षेत्रात काम करणा-या सर्व कामगारांसाठी सुरक्षात्मक उपाययोजना असणे गरजेचे आहे. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने अग्नि सुरक्षा सर्वेक्षण सुरू आहे. पिंपरी चिंचवड परिसरातील औद्योगिक क्षेत्रात कोणत्याही प्रकारच्या दुर्घटना घडू नयेत यासाठी तातडीने उपाययोजना करणे गरजेचे असुन धोकेदायक परिस्थितीमध्ये तसेच स्फोटकांचा वापर करणा-या उद्योगांची माहिती संकलित करण्याचे काम तातडीने पुर्ण करावे, अशा सूचना डॉ. गो-हे यांनी दिल्या. औद्योगीक क्षेत्रात सुरक्षात्मक उपाययोजनांची अंमलबजावणी काटेकोरपणे करण्यासाठी प्रशासकीय यंत्रणांनी औद्योगिक आस्थापनांना निर्देश द्यावेत, असे देखील डॉ. गो-हे यांनी यावेळी सांगितले.
दरम्यान, तळवडे आग दुर्घटनेतील जखमी रूग्णांवर ससून रुग्णालयात उपचार सुरु आहेत. या रुग्णांना तसेच त्यांच्या नातेवाईकांना आवश्यक मदतीसाठी पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने ससून रुग्णालयामध्ये मदत कक्ष सुरु करण्यात आला आहे. यामध्ये वैद्यकीय अधिकारी आणि २ मदतनीस यांची २४x७ नेमणूक करण्यात आली आहे, अशी माहिती आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. लक्ष्मण गोफणे यांनी दिली.